शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

corona virus :खारेपाटणमधील त्या युवकाचा मृत्यू कोरोनानेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 16:51 IST

कणकवली तालुक्यातील खारेपाटण कोंडवाडी येथील १८ वर्षीय युवकाचा शनिवार १५ आॅगस्ट रोजी शरीरातील पेशींचे प्रमाण कमी झाल्याने तसेच तापसरीने जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला होता. सोमवारी रात्री उशिरा आलेल्या स्वॅब अहवालानुसार त्या युवकाचा मृत्यू हा कोरोनामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे खारेपाटणमध्ये एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये एकप्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देखारेपाटणमधील त्या युवकाचा मृत्यू कोरोनानेचआरोग्य विभागाकडून सर्वेक्षणाला प्रारंभ

खारेपाटण : कणकवली तालुक्यातील खारेपाटण कोंडवाडी येथील १८ वर्षीय युवकाचा शनिवार १५ आॅगस्ट रोजी शरीरातील पेशींचे प्रमाण कमी झाल्याने तसेच तापसरीने जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला होता. सोमवारी रात्री उशिरा आलेल्या स्वॅब अहवालानुसार त्या युवकाचा मृत्यू हा कोरोनामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे खारेपाटणमध्ये एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये एकप्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.खारेपाटण कोंडवाडी येथील रिक्षा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाचा मुलगा पाच ते सहा दिवस तापाने आजारी होता. शेवटच्या क्षणी नाईलाज झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांच्यावतीने त्याला शासकीय रुग्णालय खारेपाटण येथे नेण्यात आले होते. त्याची अवस्था बिकट असल्याने त्याला पुढील उपचाराकरिता कणकवली उपजिल्हा रुग्णालयात व त्यानंतर जिल्हा रुग्णालय ओरोस येथे हलविण्यात आले. त्यापूर्वी खारेपाटण तपासणी नाका येथील रॅपिड टेस्ट सेंटरमध्ये १४ रोजी त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. तो निगेटिव्ह आला होता. जिल्हा रुग्णालय येथे पुन्हा कोरोना टेस्ट करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर काही तासांनी त्याचा मृत्यू झाला होता.त्याचा स्वॅब तपासणी अहवाल यायचा बाकी होता. मृत्यूची माहिती मिळताच कुटुंबातील व्यक्ती व नातेवाईक यांनी त्या युवकाचा मृतदेह आपल्या ताब्यात घेतला. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यापूर्वी आरोग्य विभागाच्यावतीने मृत युवकाचा स्वॅब तपासणी अहवाल यायचा बाकी असल्याची माहिती कुटुंबातील व्यक्तींना दिली होती व त्यानुसार योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना केल्या होत्या.खारेपाटण कोंडवाडी येथे कोविड-१९ चे सर्व नियम पाळून त्या युवकावर कुठल्याही प्रकारचे धार्मिक विधी न करता अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्या युवकाच्या मृत्यूच्या धक्क्यातून कुटुंबीय सावरत नाहीत तोपर्यंत दोन दिवसांत लगेच या मृताचा कोरोना अहवाल आरोग्य विभागाकडून आला. त्यामुळे कुटुंबातील नातेवाईकांना दु:खापेक्षा त्यानंतर निर्माण होणारी सामाजिक परिस्थिती फार वाईट असते याची भीती वाटायला लागली.खारेपाटण कोंडवाडी येथील युवकाचा मृत्यू हा कोरोनामुळे झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तालुका पातळीवरून आरोग्य विभागाची एक टीम दुपारनंतर खारेपाटण कोंडवाडी येथे दाखल झाली होती. येथील भागाचा सर्व्हे करून येथील नागरिकांच्या आरोग्याच्या व सुरक्षेच्या दृष्टीने अधिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग