कणकवली : स्वाभिमान संघटनेचा कार्यकर्ता विकास नारायण गुप्ता (वय २८, रा.चेंबूर, मुक्तीनगर, घाटला) याचा हृदयविकाराच्या धक्क्याने येथील क्रांती लॉजमध्ये मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. त्याचा मित्र आकाश रणवीरसिंग दुर्गज (वय २५, रा.चेंबूर, खारदेव नगर, घाटला) याने पोलिसांनी ही माहिती दिली. विकास गुप्ता हा शुक्रवारी रात्री जेवण करून क्रांती लॉजच्या रूम नं.१०९ मध्ये झोपला. यावेळी आकाश दुर्गज त्याच्यासोबत होता. झोपेत असतानाच विकास याला हृदयविकाराचा धक्का येऊन त्याचा मृत्यू झाला. उपजिल्हा रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले. मृताच्या नातेवाईकांचा जबाब नोंदविण्यात आला असून त्यांची कोणतीही तक्रार नाही. कणकवली पोलीस अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)
‘स्वाभिमान’च्या कार्यकर्त्याचा मृत्यू
By admin | Updated: July 20, 2014 22:15 IST