शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

दापोली शहर ‘स्मार्ट सीटी’ बनवणार

By admin | Updated: October 12, 2015 00:29 IST

जावेद मणियार : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नगरपंचायतीचा सन्मान

दापोली : दापोलीला स्मार्ट सीटी बनवणार असून, त्या दृष्टीने दापोली नगरपंचायतीची वाटचाल सुरु आहे. येत्या ६ महिन्यातच दापोलीचे बदलते रूप आपल्याला दिसणार आहे, अशी ग्वाही दापोली नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष जावेद मणियार यांनी दिली. स्वच्छ दापोली शहर ठेवल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नगरपंचायतीला सन्मानीत करण्यात आले. मणियार म्हणाले की, हा सन्मान माझ्या सर्व दापोलीकर नागरिकांचा आणि माझे सहकारी नगरसेवक तसेच नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा आहे. या सन्मानामुळे आमची जबाबदारी वाढली असून, दापोलीला स्मार्ट सीटी बनवण्याचे स्वप्न आम्ही उराशी बाळगून आहोत. हे स्वप्न लवकरच आम्ही सत्यात उतरवू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे १० आसनांचे सुलभ शौचालय, स्नानगृह असा सुमारे ३५ लाखांचा प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. मच्छीमार्केटचा खूप दिवस रखडलेला गुंता सोडवण्यात यश आले आहे. सुमारे ८० ते ९० कोळी महिलांना मासे विक्रीसाठी बसण्याची सुविधा असलेले, ५ टन माश्यांना पुरेल एवढी व्यवस्था असलेले ‘कोल्डस्टोरेज’ अशा सुविधा असलेल्या मासे व मटण मार्केटचे काम या महिन्यातच सुरू करण्यात येणार आहे. दापोली ग्रामपंचायत कार्यालयाच्या जुन्या इमारतीच्या ठिकाणी चार माळ्यांची इमारत बांधण्याच्या सुमारे १ कोटी २५ लाख रूपयांच्या कामाला अंतिम स्वरूप आले असून, काही दिवसातच या कामाला प्रारंभ केला जाणार आहे. चालू वर्षी पर्जन्यमान कमी असले तरीही पाण्याचा टँकर लागणार नाही असे नियोजन नगरपंचायतीने केले आहे. सुमारे ४० टक्के जोडण्यांवर पाणी मीटर लावण्यात आले आहेत. यामुळे प्रतिदिन दीड लाख लीटर पाणी शिल्लक रहात असून, पाण्याचा अपव्यय कमी झाला आहे. महाराष्ट्र भूजल निर्मल योजनेतून व दलितवस्ती सुधार योजनेतून दलितांना नळ जोडणी व शौचालयासाठी प्रती कुटुंबाला रुपये १२,०००चा निधी देण्याचे प्रस्तावित असून, त्या अनषंगाने पूर्तता करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छतेबाबत मनुष्यबळ कमी आहे तसेच गाड्यासुध्दा मर्यादित आहेत तरीही योग्य नियोजनामुळे कचरा रस्त्यात न टाकता तो जमा करून नेण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याचे मणियार यांनी सांगितले. स्वच्छता अभियान अंतर्गत शहरातील शाळांमधून जनजागृती करून प्रत्येक घरात बचत गटांच्या माध्यमातून कचऱ्यांचे डबे देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ओला व सुका कचरा जमा करण्याचे प्रशिक्षण देऊन कचऱ्यापासून वीज निर्मिती करुन दिवे लावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दापोली शहर लवकरच कात टाकणार असून, दापोलीचे नवीन बदललेले रूप आपल्याला पहायला मिळेल, असा विश्वास नगराध्यक्ष जावेद मणियार यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)शासनाचा पुरस्कार हा नगरसेवक, कर्मचारी आणि नागरिकांचा : मणियार.सन्मानामुळे जबाबदारी वाढली.ग्रामपंचायत कार्यालयाच्या जुन्या इमारतीच्या ठिकाणी चार मजल्यांच्या नवीन इमारतीचे काम अंतिम टप्प्यात.