शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
3
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
4
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
5
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
6
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
7
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
8
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
9
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
10
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
11
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
12
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
14
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
15
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
16
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
17
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
18
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
19
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
20
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा

‘डेंजर’ कशेडीतून वाहतूक सुरुच

By admin | Updated: July 9, 2015 23:48 IST

सुरक्षेकडे दुर्लक्ष : बांधकाम खात्याची बेपर्वाई

खेड : वारंवार कोसळणाऱ्या दरडी, खचणारा रस्ता यामुळे कशेडी घाटाचा यंदाही डेंजर झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. वाढणारी वाहतूक लक्षात घेता बांधकाम खात्याने यावर्षीही या मार्गावर सुरक्षेची कोणतीही काळजी घेतलेली नाही. सलग दोन वर्षे याच घाटात अजस्त्र दरड कोसळून संपूर्ण वाहतूक काही दिवस बंद झाली होती. घाटाला पर्याय म्हणून नातूनगरमार्गे तुळशीमधून असलेल्या मार्गाचे मजबूतीकरण करणे आवश्यक आहे. हा मार्ग बंद पडला, तर कशेडी घाटासाठी महाड - शिरगाव येथून तुळशी खिंडमार्गे नातूनगर हा पर्यायी मार्ग आहे. मात्र, हा राज्यमार्ग असल्याने कशेडी घाटात वाहतूक ठप्प झाल्यानंतर वाढणाऱ्या पर्यायी वाहतुकीचा बोजा सहन करण्यासाठी त्याचे मजबूतीकरण करणे आवश्यक आहे. या घाटमाथ्यावरून दररोज शेकडो वाहने ये-जा करतात. मात्र, वाढणारी वाहनांची संख्या, अवजड वाहतूक व निसर्गाचा कहर यामुळे हा घाट अतिधोकादायक झाला आहे. गतवर्षी रायगड जिल्ह्यातील भोगावच्या हद्दीत काही वर्षांपासून कोसळणाऱ्या दरडींमुळे १५० मीटर अंतराचा रस्ता खचला होता. जुलै २००५मध्ये झालेल्या अतिवृष्टीत धामणदिवी व भोगावच्या हद्दीत कोसळलेल्या दरडींमुळे हा मार्ग १२ दिवस बंद होता. २०११ मध्ये ऐन गणेशोेत्सवात ३ आणि ४ आॅगस्टला खेड तालुक्यातील काळकाई मंदिरापासून जवळच तीन वेळा मोठ्या दरडी कोसळून हा मार्ग बंद झाला होता. महाड मार्ग बांधकाम विभागाकडून भोगावच्या हद्दीत खचणारा रस्ता दरवर्षी दुरूस्त करण्यात येतो. घाटातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलीस चौकी असली तरी या शाखेकडे पोलीस दल अपुरे आहे. अपघातग्रस्त वाहनांना रस्त्यावरून बाजुला करण्यासाठी क्रेन आहे. त्यामुळे पोलिसांना मदतकार्यात, आपत्ती काळात अडचणी निर्माण होतात. महाड - शिरगाव येथून तुळशी खिंडमार्गे नातूनगर हा पर्यायी मार्ग आहे. मात्र, हा राज्यमार्ग असल्याने कशेडी घाटात वाहतूक ठप्प झाल्यानंतर पर्यायी वाहतुकीचा बोजा सहन करण्यासाठी त्याचे मजबुतीकरण करणे आवश्यक आहे.(प्रतिनिधी)महामार्गावरील महत्त्वाचा घाट म्हणून कशेडी घाटाची ओळख आहे. या घाटात दरडी कोसळल्याने वेळोवेळी वाहतूक ठप्प होते. महाडच्या हद्दीतल भोगाव रस्ता दुरूस्त करण्यात येतो. मात्र, यंदा रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवरील कशेडी घाटातील दरडीचा प्रश्न तसाच आहे.