शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 23:19 IST

कुडाळ : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी सर्वप्रथम मागणी राज्यपालांकडे शिवसेनेनेच केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. ...

कुडाळ : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी सर्वप्रथम मागणी राज्यपालांकडे शिवसेनेनेच केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. जास्तीत जास्त व तत्काळ नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी लवकरच राज्यपालांची भेट घेणार आहे, असे आश्वासन युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी कुडाळ तालुक्यातील शेतकºयांना दिले. लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोकणातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी ठाकरे यांनी शेतबांधावर बसूनच शेतकºयांशी संवाद साधला.यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, शिवसेनेचे जिल्हासंपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, संदेश पारकर, जिल्हा परिषद सदस्य व गटनेते नागेंद्र्र परब, सभापती राजन जाधव, उपसभापती श्रेया परब, जिल्हा परिषद सदस्य संजय पडते, अमरसेन सावंत, तहसीलदार रवींद्र्र नाचणकर, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, तालुका कृषी अधिकारी रमाकांत कांबळे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, तालुकाप्रमुख राजन नाईक, पंचायत समिती सदस्य जयभारत पालव, बबन बोभाटे, अतुल बंगे, नगरसेवक सचिन काळप, राजू जांभेकर, सुशील चिंदरकर, योगेश धुरी तसेच इतर अधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसामुळे येथील शेती बागायतींसह मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पर्यटन व्यवसायावरही त्याचा परिणाम झाला आहे. या सर्व नुकसानीची पाहणी करण्यासाठी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग जिल्हा दौºयावर आले होते. यावेळी त्यांनी कुडाळ तालुक्यातील निवजे, माणगाव येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली व शेतकºयांशी संवाद साधला. महाराष्ट्र राज्यात ओला दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वप्रथम आम्ही शिवसेनेच्यावतीने राज्यपालांकडे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सुचनेनुसार प्रथम कोकणातील शेतकरी व मच्छिमार बांधवांची भेट घेऊन नुकसानीची पाहणी करण्यासाठी मी आलो आहे. सध्या मराठवाडा दौºयावर असलेले उद्धव ठाकरे लवकरच कोकणात येऊन येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत, असेही ठाकरे यांनी सांगितले.