शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

धरणांचा घसा कोरडाच!

By admin | Updated: August 23, 2015 00:40 IST

कोकण विभाग : अनेक धरणांमध्ये ८० टक्क्यांपर्यंत साठा

रत्नागिरी : यावर्षी पाऊस कमी पडल्याने कोकणातील धरणांचा पाणीसाठा खालावला आहे. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्याची भीती वर्तविण्यात येत आहे. कोकणातील १५८ मोठे, मध्यम व लघु पाटबंधारे जलाशयात अद्याप ८० टक्केच पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदूर्ग, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यात ३ मोठे प्रकल्प आहेत. प्रकल्पाची पाणी साठवणुकीची क्षमता ७३३ दक्षलक्षघनमीटर इतकी असताना केवळ ६१२ दक्षलक्षघनमीटर इतकी आहे. मागील आठवड्यात ५८० (दलघमी) इतका साठा होता. गतवर्षी (२०१४ मध्ये) याचवेळी ६८७ (दलघमी) साठा असल्याने ९४ टक्के तर २०१३ मध्ये ७०४ (दलघमी) साठा असल्याने ९६ टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत ११ टक्केने पाणीसाठा घटला आहे. मध्यम प्रकल्प ५ असून पाणीसाठा क्षमता ३८९ (दलघमी) इतकी असताना प्रत्यक्षात पाणीसाठा २९३ (दलघमी) इतके आहे. मागील आठवड्यात २८७ (दलघमी) पाणीसाठा होता त्यामध्ये ६ (दलघमी) ने वाढ झाली असल्यामुळे ७५ इतका पाणीसाठा आहे. २०१४ मध्ये ३२९ (दलघमी) अर्थात ८५ टक्के तर २०१३ मध्ये ३२८ (दलघमी) अर्थात ८४ पाणीसाठा आहे. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत १० टक्के पाण्याची पातळी खालावलेली आहे. लघु प्रकल्प १५० असून, प्रकल्पांतील जलाशयांची पाणीसाठा क्षमता ५४७ (दलघमी) इतकी आहे. मात्र सध्या ४२९ (दलघमी) इतकेच पाणी आहे. गेल्या आठवड्यात ४२० (दलघमी) पाणी होते. पाऊसच कमी झाल्यामुळे जेमतेम ९ (दलघमी) पाणी वाढले आहे. त्यामुळे पाण्याचा साठा ७८ टक्के इतकाच राहिला आहे. गतवर्षी (२०१४) च्या तुलनेत एक (दलघमी) ने पाणीसाठा कमी आहे. परंतु २०१३ मध्ये ४५६ (दलघमी) इतका पाणी साठा होता. त्यामुळे त्यावेळी ८३ टक्के पाणीसाठा असताना यावर्षी पाच टक्केने पाणीसाठा कमी आहे. कोकणात लघु, मध्यम, मोठे प्रकल्प मिळून १५८ जलाशय आहेत. १६६९ (दलघमी) पाणीसाठा क्षमता असताना प्रत्यक्षात १३३४ (दलघमी) पाणीसाठा आहे. गेल्या आठवड्यात १२८७ (दलघमी) पाणीसाठा होता त्यामध्ये ४७ (दलघमी) ने वाढ झाली आहे. त्यामध्ये ८० टक्के जलाशयात साठा झाला आहे. २०१४ मध्ये १४४६ (दलघमी) पाणी असल्याने ८७ टक्के तर २०१३ मध्ये १४८८ (दलघमी) पाणी असल्याने ८९ टक्के पाणीसाठा होता. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत ९ ते ७ टक्केने पाणीसाठा खालावलेला आहे. कोकणात जून-जुलैमध्ये साधारणत: ९०३७.९ मिलीमीटर इतका पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात ८३८२.९ मिलीमीटर इतका झाला आहे. आॅगस्टमध्ये २५१२.३ मिलीमीटर पडणे अपेक्षित असताना तो १०३०.३ मिलीमीटर इतकाच पडला आहे. पावसाचे प्रमाणच खालावलेले असल्यामुळे जलाशयातील पाण्याची पातळी घटली आहे. सप्टेंबरपासून पाऊस मंदावतो. त्यामुळे अशीच स्थिती कायम राहिली तर जलाशयाची पातळी आणखी खालावण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या भीषण संकटास सामोरे जावे लागणार आहे. (प्रतिनिधी)