शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

आचऱ्यात डाळपस्वारी परिक्रमा सुरु

By admin | Updated: April 12, 2015 00:50 IST

शाही सोहळा : रामेश्वर देवस्वारीचा अनोखा होडी प्रवास

आचरा : रयतेची सुखदु:खे जाणून घेताना देवस्थानच्या भेटीगाठी घेण्यासाठी आपल्या तरंग स्वारीसह, भालदार, चोपदार, हुद्देदार, अबदागीर, निशाणे, ताशा, वाजंत्रीसह गावच्या परिक्रमेस निघालेले श्री देव रामेश्वर शनिवारी जामडूल बेटावर पोहोचले. गाऊडवाडी-जामडूल-पिरावाडी हा आचरा खाडीपात्रातून होणारा देवस्वारीचा होडी प्रवास अनोखा व डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. हजारो भाविकांची यावेळी गर्दी होती. सर्वधर्मियांच्या सोबतीने साजरा होणारा हा शाही सोहळा खऱ्या अर्थाने आपले वेगळेपण जोपासत आहे. आचरा गावातील बारा वाड्यांतील रयतेचे दु:ख जाणून घेत निघालेल्या या देवस्वारीचा आजचा तिसरा दिवस होता. संपूर्ण आचरा गाव सजून देव रामेश्वर आपल्या अंगणात येईल याची वाट लोक पहात होते. गुढ्या तोरणे, पताका, रांगोळी सडा यांनी सुशोभीकरण करण्यात आले होते. शनिवारी गाऊडवाडी ब्राह्मणदेव मंदिरातून निघालेली ही स्वारी रयतेला आशीर्वाद देत जामडूल बेटावर पोहोचली. बेटाच्या पलीकडे हजरत पीर इब्राहिम खलील पीर यांचा मान सोहळा करण्यात आला. तर बेटावर जेरोन फर्नांडिस यांनी भाविकांना महाप्रसाद दिला. गाऊडवाडी, हिर्लेवाडी येथे ग्रामस्थांनी भाविकांसाठी केलेला शीतपेय-अल्पोपहार व ठिकठिकाणी देण्यात येणारी प्रसाद सुविधा व पिरवाडी येथे भाविकांना केलेली मोफत होडी सेवा आचरा गावची एकी व सर्वधर्म समभावाचा अनोखा मेळ दर्शवित होती. सायंकाळी श्री स्वारी बोटीतून पिरावाडी येथे आली. पिरावाडी हिर्लेवाडी बंधारा या पारंपरिक मार्गाने रात्री ब्राह्मणदेव मंदिरात विश्रांतीनंतर पुन्हा नागझरी येथील गिरावळ मंदिरात विश्रांती घेणार आहे. १२ एप्रिल व १३ एप्रिल रोजी श्रींची स्वारी मुक्काम करणार असून, १४ एप्रिल रोजी देवी गिरावळ मंदिरातून ब्राह्मण मंदिर नागोचीवाडी, ब्राह्मण मंदिर पारवाडीमार्गे श्री स्वारींचे रामेश्वर येथे आगमन होणार आहे.