शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

नंबरप्लेटवर दादा-मामा

By admin | Updated: February 19, 2015 23:40 IST

नियम धाब्यावर : विविधांगी प्लेटस्मुळे पोलीस हतबल

फुणगूस : वाहनांच्या नंबरप्लेटच्या जागी वेगवेगळी विशेषणे लावण्याच्या हव्यासापोटी पोलीस यंत्रणा हवालदिल झाली आहे. यानंतर अजून कोणत्या पद्धतीचा वापर केला जाणार व कितीजणांवर कारवाईचे हत्यार उपसावे लागणार, हा पोलिसांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे.वाहनांच्या नंबरप्लेट कशा असाव्यात, याबाबत परिवहन विभागाने नियमावली तयार केली असली तरी ती पाळली जात नसल्याचे पाहायला मिळते आहे. इंग्रजी क्रमांकांना मराठी अक्षरामध्ये स्वरुप देऊन अफलातून कल्पना लढवून नाना, बॉस, दादा, राज, बाबा अशी विशेषणे लावून आपल्याला गाडीची विशिष्ट ओळख करुन देण्याची सध्या चुरस लागली आहे.संगणकीय युगात वाहनांचे नंबर प्लेट संगणकाच्या सहाय्याने बनवण्यात येऊ लागल्यापासून या नंबरप्लेट अधिकाधिक फॅन्सी कशा बनवता येतील, याकडे संबंधितांचे लक्ष आहे. त्यातूनच मग ७१७१ क्रमांक असेल तर मराठी शब्द नाना, ४१४१ हा क्रमांक असेल तर मराठी शब्द दादा, ८०५५ असेल तर इंग्रजी शब्द बॉस अशा अनेक रचना नंबरप्लेट निर्मात्यांनी आणि नंबर धारकांनीही बनवल्या असल्याचे दिसून येत आहे, तर एवढ्यावर न थांबता काही ठिकाणी नंबरप्लेटवरील आकड्यांची उंची आणि रुंदी कमी करुन त्या जागी आपल्या लाडक्या बाळाचा फोटो लावला जातो. आवडत्या नेत्याच्या किंवा पदाचा सिम्बॉलचा फोटो लावून आपण किती कट्टर आहोत हे दाखवण्याचा खटाटोप केलेला दिसून येत आहे.वास्तविक आरटीओंनी बनवलेल्या नियमावलीत वाहनांच्या नंबर प्लेट कशा असाव्यात? त्याची लांबीŸरुंदी किती असावी? त्यावरील अक्षरे आणि आकड्यांची लांबीŸरुंदी किती असावी? अक्षरांचा रंग कोणता असावा, याविषयी मापदंड ठरवून दिलेले आहेत असे असूनसुद्धा रस्त्यावरुन अशा प्रकारच्या फॅन्सी नंबरप्लेटवाल्या गाड्या अद्याप धावतच आहेत. याकडे आरटीओ दुर्लक्ष का करतात, अशी विचारणा जनतेकडून केली जात आहे.यापूर्वी शासनाने काढलेल्या फतव्यानुसार आपल्या गाडीवर आपल्या व्यवसायाशी संबंधित कोणतेही सूचक शब्द उदा. पोलीस, आश्मी, प्रेस वगैरे लिहू नयेत असा आदेश देण्यात आला होता. पण, तो आदेश धाब्यावर बसवले जात असून, अजूनही अनेक वाहनाच्या मागे पुढे सूचक शब्द लिहिलेले दिसून येतच असतात. आता प्रश्न आहे तो या बाबा, बॉस, दादा, नाना वर कारवाईचा बडगा केव्हा उगारणार. कारण अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई न झाल्यास जनतेचा नियमावलीवरचा विश्वास उडून जातो. त्यामुळे आरटीओ आणि पोलीस यंत्रणेने अशा प्रकारच्या नंबरप्लेटबाबत कडक धोरण अवलंबावे, अशी मागणी केली जात आहे. असे विशिष्ट क्रमांक विकत घेणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. याबाबत अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)वाहनांच्या नंबर प्लेट्स रंगीबेरंगी व विविध शैलीत करण्याच्या तयारीत वाहनचालक असतात. आदेश धाब्यावर बसवून व्यवहार केला जात असल्याबद्दल नाराजी आहे.