शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

सिलिंडर असणाऱ्यांचे रॉकेल होणार बंद

By admin | Updated: October 30, 2015 23:11 IST

सामान्यांचा प्रश्न : ४२ हजार ग्राहकांना फटका

सिंधुदुर्गनगरी : ज्या ग्राहकांचे एक गॅस कनेक्शन आहे त्यांना रेशनवर मिळणारे रॉकेल गायब झाले आहे. या महिन्यापासून याची अंमलबजावणी जिल्हा पुरवठा विभागाच्या माध्यमातून सुरु झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ४१ हजार ९७५ गॅस ग्राहकांना याचा फटका बसला आहे. यापूर्वी दोन गॅस सिलिंडर ग्राहकांचे रॉकेल बंद करण्यात आले होते. तर २० आॅगस्टला राज्य शासनाने एक जरी गॅस सिलिंडर असला तरी ग्राहकांचे रॉकेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी या महिन्यापासूनच सुरु झाली आहे. हा शासन निर्णय होण्यापूर्वी या ग्राहकांना रेशनकार्डवर चार लीटर रॉकेल मिळत होते. परंतु आता हे पूर्ण बंद झाले आहे. त्याबरोबर बिगर गॅसधारकांचेही रॉकेल कमी करण्यात आले आहे. कुटुंबातील व्यक्तीनुसार रॉकेल पुरवठा केला जात आहे. यामध्ये एका व्यक्तीसाठी ४ लिटर रॉकेल मिळत आहे. शासनाने ग्रामीण व शहरी भागामध्ये एकच प्रमाण ठेवले आहे अशी माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आली व शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी सुरु असून इथून पुढे बिगर गॅसधारकांनाच रॉकेल मिळणार आहे व तेही शासनाच्या धोरणाप्रमाणेच अशीही माहिती देण्यात आली. सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत जिल्ह्यातील ४१ हजार ९७५ गॅस ग्राहकांना केरोसिनचे वितरण बंद करण्यात आले आहे. रास्त भाव दुकानांमधून मिळणारे केरोसिन मिळत नसल्याने आता केरोसिन आणणार कोठून असा पेच जिल्ह्यातील गॅस सिलिंडर ग्राहकांसमोर निर्माण झाला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत एक गॅस सिलिंडरधारक ग्राहकांना दोन लीटर केरोसिनचे वितरण रास्त भाव दुकानांमधून करण्यात येत होते. परंतु राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील गॅस सिलिंडर ग्राहकांना दरमहा वितरीत करण्यात येणारे केरोसिनचे वितरण बंद करण्यात येत असल्याचा निर्णय शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत २० आॅगस्ट २०१५ रोजी घेण्यात आला. (प्रतिनिधी) ग्राहकांसमोर पेच : पुरवठा बंद झाल्याची माहिती ४सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये दरमहा मिळणारे केरोसिन मिळत नसल्याने गॅस सिलिंडर संपल्यानंतर नवीन सिलिंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाक व इतर कामासाठी उपयोगात येणारे केरोसिन आता कोठून आणणार असा प्रश्न जिल्ह्यातील गॅस सिलिंडर ग्राहकांसमोर निर्माण झाला आहे. ४सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग -२२६०, सावंतवाडी - ६३८०, वैभववाडी - ७३३, कुडाळ - ९१५७, मालवण - ४५९५, कणकवली - ११७१७, वेंगुर्ला - ३८१३ व देवगड - ३३२० असे एकूण ४२ हजार ९७५ गॅस ग्राहकांचा रॉकेल पुरवठा बंद करण्यात आला असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली.