शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Cyclone Nisarga : भुईबावडा परिसराला चक्रीवादळाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 17:08 IST

वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा, तिरवडे तर्फ खारेपाटण आणि हेत या तीन गावात गुरुवारी पहाटेच्या सुमारास चक्रीवादळ झाले. या चक्रीवादळात तिरवडेतील २ तर भुईबावड्यातील एका घराचे नुकसान झाले आहे. तर हेत केंद्रशाळेच्या छपराचे नुकसान झाले आहे. वीजवाहिन्या तुटल्याने गावातील काही भागाचा वीजपुरवठा खंडित झाला असून काजू बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देभुईबावडा परिसराला चक्रीवादळाचा फटका

वैभववाडी : तालुक्यातील भुईबावडा, तिरवडे तर्फ खारेपाटण आणि हेत या तीन गावात गुरुवारी पहाटेच्या सुमारास चक्रीवादळ झाले. या चक्रीवादळात तिरवडेतील २ तर भुईबावड्यातील एका घराचे नुकसान झाले आहे. तर हेत केंद्रशाळेच्या छपराचे नुकसान झाले आहे. वीजवाहिन्या तुटल्याने गावातील काही भागाचा वीजपुरवठा खंडित झाला असून काजू बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.निसर्ग वादळाचा धोका बुधवारी टळल्यानंतर पाऊसही कमी झाला. त्यामुळे तितकेसे नुकसान झाले नाही. मात्र, गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास भुईबावडा परिसराला चक्रीवादळाचा सौम्य तडाखा बसला.भुईबावडा पहिलीवाडी येथील दीपक सीताराम पांचाळ यांच्या घराची कौले वादळात उडून गेली. तसेच सिमेंटचे पत्रेही फुटले आहेत. त्यामुळे साखरझोपेत असलेल्या पांचाळ कुटुंबाला धडकी भरली. सुदैवाने कोणालाही ईजा झाली नाही. मात्र, पांचाळ यांचे १३ हजार ६२५ रुपयांचे नुकसान झाले.

तिरवडे तर्फ खारेपटण येथील श्रीधर कलमष्टे यांच्या घराच्या छपराचे सर्व पत्रे वादळात उडून गेले. त्यामुळे कलमष्टे यांचे ३० हजार रुपयांचे तर रघुनाथ शंकर पवार यांच्या घराच्या छपराचे ३ हजार रुपये नुकसान झाले. या नुकसानीचा महसूल विभागाने पंचनामा केला आहे.हेत केंद्रशाळेच्या छपराचे पत्रे उडालेहेत केंद्रशाळेच्या छपराचे पत्रे आणि कौले फुटली आहेत. तर वीजवाहिन्या तुटल्याने गावातील काही भागाचा वीजपुरवठा दिवसभर खंडित झाला होता. चक्रीवादळामुळे हेत गावातील काजू बागायतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, २४ तासांत तालुक्यात १०८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

टॅग्स :cycloneचक्रीवादळsindhudurgसिंधुदुर्ग