शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

करूळ, भुईबावडामध्ये पडझड सुरूच

By admin | Updated: June 20, 2015 00:36 IST

सिंधुदुर्गात संततधार : घाटातून एकेरी वाहतूक, जांभवडेत गोठा कोसळून वासराचा मृत्यू

वैभववाडी : गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे करुळ आणि भुईबावडा घाटात दरडींची पडझड सुरुच आहे. त्यामुळे दुपारपर्यंत एकेरी वाहतूक सुरु होती. सार्वजनिक बांधकामने जेसीबीद्वारे दरडी हटवून वाहतूक सुरळीत केली आहे. दरम्यान, जांभवडेत गोठा कोसळून वासराचा मृत्यू झाला तर ऐनारी फाट्यानजीक झाड पडल्याने खारेपाटण-गगनबावडा मार्ग काही तास पूर्णपणे बंद होता. तसेच भोम आणि भुईबावड्यात दोन घरांचे नुकसान झाले आहे.गेल्या ४८ तासातील अतिवृष्टीमुळे दोन्ही घाटमार्गात दरडी कोसळण्याचे सत्र सुरुच आहे. परंतु या दरडी छोट्या स्वरूपाच्या असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली नव्हती. भुईबावडा घाटात उशिरा चार ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. त्यामुळे दुपारपर्यंत एकेरी वाहतूक सुरु होती. गगनबावड्यापासून सुमारे अडीच किलोमीटरवर कोसळलेल्या दरडीने निम्मा अधिक रस्ता व्यापला होता. तरीही एकेरी वाहतूक सुरु होती. घाटातील रस्त्यालगतची गटारे गाळाने भरल्याने पावसाचे संपूर्ण पाणी रस्त्यावरून वाहत आहे.करुळ घाटातही चार ठिकाणी छोट्या दरडी कोसळल्या होत्या. सकाळी ९ वाजल्यापासून जेसीबीद्वारे करुळ घाटातील दरडी हटविण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरुवात केली. वाहतुकीला अडथळा ठरणारे ढिगारे हटवून दुपारी १ नंतर भुईबावडा घाटातील दरडी हटविण्यास सुरुवात केली. त्यामुळे दुपारनंतर दोन्ही घाटातील वाहतूक सुरळीत झाली. सार्वजनिक बांधकामचे शाखा अभियंता वनमोरे आणि सावंत दिवसभर घाटात हजर होते. घाटमार्गांच्या गटारातील गाळ काढण्याबरोबरच उर्वरित छोट्या दरडी हटविण्याचे काम शनिवारी सकाळी सुरु केले जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक साहित्य जळालेवेंगुर्लेत बुधवारी रात्री विजेचा अचानक दाब वाढल्याने राजू शिरोडकर, दिलीप राऊळ, मंदार कामत आदींसह नागरिकांचे टीव्ही, फॅन, फ्रीज, ट्युुब, बल्ब आदी इलेक्ट्रॉनिक साहित्य जळाले. शिवाजी चौकातील ट्रॉन्सफार्मरही जळाला. पावसासह घोंगावणाऱ्या वादळी वाऱ्याने वारंवार वीज पुरवठा खंडित झाल्याने जनजीवन काहीसे विस्कळीत झाले होते. तालुक्यात पावसाची संततधार उशिरापर्यंत सुरूच होती. (प्रतिनिधी)जनशताब्दी रद्द, कोकण रेल्वे विस्कळीतसंततधार पावसाने मुंबईला झोडपून काढल्याने कोकण रेल्वेच्या गाड्यांवरही परिणाम झाला. १९ आणि २० जून रोजीची गोव्याच्या दिशेने जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तर अनेक गाड्या उशिराने धावत होत्या. गोव्याच्या दिशेने जाणारी मांडवी एक्स्प्रेसही उशिराने धावत होती. दिवा पॅसेंजर दोन तास उशिराने धावत होती. मुंबईच्या दिशेने जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस शुक्रवारी दोन तास उशिराने धावत होती. मुंबई एक्स्प्रेस २ तास २५ मिनिटे उशिराने धावत होती. गोव्याकडे जाणारी मंगला एक्स्प्रेस पाच तास उशिराने धावत होती. एर्नाकुलम पुणे गाडी आणि कोकणकन्या अप एक्स्प्रेसही उशिराने धावत होत्या. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. पावसाची दमदार सुरूवातसिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असून गेल्या २४ तासात सरासरी ६९.०८ मिलीमीटर तर आतापर्यंत एकूण सरासरी ४४२.३८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.