शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

भालचंद्र महाराजांचा ११६ वा जन्मोत्सव सोहळ्याला भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 12:50 IST

योगियांचे योगी परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ११६व्या जन्मोत्सव सोहळ्याने अवघी कनकनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. नामजप, आरती, भजने यातून बाबांचा जयघोष सुरू आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून दरदिवशी भाविक या उत्सवाला कणकवलीत येत आहेत.

ठळक मुद्देभालचंद्र महाराजांचा ११६ वा जन्मोत्सव सोहळ्याला भाविकांची गर्दी कणकवलीनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली

कणकवली : योगियांचे योगी परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ११६व्या जन्मोत्सव सोहळ्याने अवघी कनकनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. नामजप, आरती, भजने यातून बाबांचा जयघोष सुरू आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून दरदिवशी भाविक या उत्सवाला कणकवलीत येत आहेत.बुधवार आणि गुरुवार असे उत्सवाचे दोन दिवस भक्तांचा जनसागरच कणकवलीत अवतरणार आहे. बुधवार १५ जानेवारी रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत ११६ रक्तदाते या उत्सवानिमित्त रक्तदान करणार आहेत. भालचंद्र महाराजांच्या जन्मोत्सवाचा प्रत्येक दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने साजरा होत आहे.

पहाटेच्या काकड आरतीपासून भाविकांची पावले बाबांच्या संस्थानात वळतात ती रात्री उशिरापर्यंत समाधी दर्शनासाठी लगबग सुरूच असते. विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच भाविकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमही होत आहेत.सोमवारी सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत दशावतार कलाकारांचा संयुक्त दशावतार झाला. यामध्ये शंभूचे लग्न हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. त्याला रसिकांनी उत्स्फूर्तपणे दाद देत मोठ्या संख्येने हा नाट्यप्रयोग पाहिला. तर मंगळवारी सायंकाळी श्री देव रवळनाथ प्रासादिक नाट्यमंडळ अंतर्गत श्रींची इच्छा कलामंच तोंडवली यांचे बाळ कोल्हटकर लिखित तीन अंकी सामाजिक संगीत नाटक दुरितांचे तिमिर जावो झाले.

बुधवार १५ जानेवारी रोजी सायंकाळी श्री सद्गुरू माऊली महाराज वाळुंजकर यांच्या भक्त पूनम नळकांडे आणि सहकारी (पुणे) यांचा भक्तिगीत, अभंगवाणीचा कार्यक्रम होणार आहे.परमहंस भालचंद्र महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त परिसर आणि घर सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्त कणकवली बाजारपेठ आकर्षक अशा विद्युत रोषणाई आणि पताकांनी सजली आहे. ठिकठिकाणी परमहंस भालचंद्र महाराज यांची प्रतिकृती असलेले देखावे साकारण्यात आले आहेत. भालचंद्र महाराजांचा हा उत्सव भाविकांसाठी चैतन्याची आणि मांगल्याची पर्वणी ठरला आहे. 

टॅग्स :Bhalchandra maharaj temple Kankavaliभालचंद्र महाराज मंदिर कणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग