शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

बांद्यात मगरींची दहशत !

By admin | Updated: June 8, 2014 01:13 IST

वनखात्याची असमर्थता : हल्ल्यांच्या संख्येत वाढ

नीलेश मोरजकर - बांदा तेरेखोल नदिपात्रात मगरींच्या संख्येत गेल्या दोन वर्षात लक्षणीय वाढ झाली असून या मगरींची पिल्ले आता भर वस्तीतही येऊ लागल्याने हा चिंतेचा विषय होऊ लागला आहे. गेल्या दोन वर्षात मगरींकडून होणाऱ्या हल्ल्यांत वाढ झाल्याने तेरेखोल नदिकिनाऱ्यालगत असलेल्या गावातील लोकांना या मगरींच्या दहशतीच्या छायेखाली रहावे लागत आहे. तेरेखोल नदिपात्रात मगरींचे वाढते प्रस्थ असूनही वन खाते मात्र कायद्याकडे बोट दाखवून या मगरींच्या बंदोबस्ताबाबत असमर्थतता दाखवत आहे. वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना मगरींना पकडण्याचे तंत्र अवगत नसल्याने या मगरींचा वावर मानवी वस्तीत वाढला आहे. आतातर पाळीव प्राण्यांबरोबरच माणसांवरही मगरींकडून हल्ला होण्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या दोन वर्षात तब्बल दहा वेळा मगरींकडून हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये जनावरे तसेच स्थानिक शेतकरी जखमी झाले आहेत. मगरींची दहशत गेल्या दोन वर्षात मडुरा, पाडलोस, शेर्ले, कास परिसरात पाळीव गुरे, कुत्रे यांचा मगरींनी फडशा पाडल्याच्या घटना घडल्या आहेत. गतवर्षी मडुरा येथे मगरीने शेतकऱ्यावर हल्ला केल्याने शेतकरी गंभीररित्या जखमी झाला होता. मात्र, वनखाते केवळ पंचनामा करण्याचे काम करत असल्याने वनखात्याबाबत स्थानिकांमध्ये प्रचंड रोष आहे. या मगरींची दहशत नदिपात्रात वाढल्याने शेतकऱ्यांना नदितिरालगत शेती करणे देखिल जीवावर बेतणारे ठरत आहे. मगरींची पैदास ही तेरेखोल नदिपात्रात झपाट्याने होत आहे. जानेवारी ते एप्रिल महिना हा मगरींच्या प्रजननाचा काळ असतो. मगर मादी ही एका वेळेला २0 ते २५ पिल्लांना जन्म देते. यामुळे तेरेखोल नदिपात्रात मगरींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तेरेखोल नदिपात्रात ओटवणे, सरमळे, बांदा, शेर्ले, कास, वाफोली, मडुरा, सातोसे पर्यंत मगरींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. वनखात्याच्या अंदाजानुसार तेरेखोल नदिपात्रात ५00 च्या वर छोट्या व मोठ्या मगरी आहेत. यातील काही मगरी या १५ फुटाहून अधिक लांबीच्या आहेत. या मगरींचा वावर दिवसाढवळ्या नदिकिनाऱ्यालगत असल्याने घबराटीचे वातावरण आहे. गतवर्षी बांदा शहरासह शेर्ले, वाफोली येथे मगरींची पिल्ले मानवी वस्तीत सापडली होती. पावसाळयात पुराच्या पाण्याबरोबर वाहत आल्याने ही पिल्ले मानवी वस्तीत शिरली. मगरींची पिल्ले मानवी वस्तीत सापडण्याच्या घटना सर्रासपणे घडत असल्याने तेरेखोल नदितील मगरींच्या संख्येत वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे.