शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

खासदारांनी मच्छिमारांचीही केली दिशाभूल, परशुराम उपरकर यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 16:05 IST

शेतकरी तसेच प्रकल्पग्रस्तांना ते न्याय देऊ शकले नाहीत. खड्डेमय रस्त्यात आतापर्यंत २५० लोकांचा अपघाती मृत्यू व ५०० लोक जायबंदी झाले आहेत. त्याला जबाबदार सत्ताधारी, पालकमंत्री आणि खासदार असल्याचा आरोप मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी येथे केला.

ठळक मुद्देखासदारांनी मच्छिमारांचीही केली दिशाभूलपरशुराम उपरकर यांची टीका

कणकवली : मुंबई-गोवा चौपदरीकरणात असंख्य प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांकडे व शेतकऱ्यांच्या समस्यांकडे खासदार विनायक राऊत यांनी दुर्लक्ष केले आहे. अनेकदा महामार्गाची पाहणी करीत बैठका घेतल्या. मात्र, शेतकरी तसेच प्रकल्पग्रस्तांना ते न्याय देऊ शकले नाहीत. खड्डेमय रस्त्यात आतापर्यंत २५० लोकांचा अपघाती मृत्यू व ५०० लोक जायबंदी झाले आहेत. त्याला जबाबदार सत्ताधारी, पालकमंत्री आणि खासदार असल्याचा आरोप मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी येथे केला.कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर उपस्थित होते. यावेळी परशुराम उपरकर म्हणाले, लोकसभा निवडणूक आल्यानंतर खासदार विनायक राऊत पुन्हा आश्वासनांची खैरात करू लागले आहेत. गेल्या पाच वर्षांपूर्वी निवडणुकीत त्यांनी दिलेली आश्वासने केंद्रात आणि राज्यात सत्तेत असताना किती पूर्ण केली? त्याची विचारणा जनतेने केली पाहिजे.मोबाईल मनोऱ्यांची भूमिपूजने करून विनायक राऊत यांनी श्रेय लाटले. पण खºया अर्थाने जिल्ह्यातील दूरसंचारची लॅण्डलाईन सेवा कोलमडली आहे. त्याला श्रेय लाटणारे राऊतच जबाबदार आहेत. एका बैठकीमध्ये दूरसंचारची सुविधा न सुधारल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा खासदारांनी दिला होता. हा इशारा जनतेची दिशाभूल करणारा ठरल्याचे परशुराम उपरकर यावेळी म्हणाले.ते पुढे म्हणाले, आरोग्याच्या प्रश्नात जिल्ह्याची दयनीय अवस्था झालेली आहे. पर्ससीन आणि पारंपरिक मच्छिमारांच्या प्रश्नाबाबत खासदारांची भूमिका संशयास्पद राहिली आहे. अनेकदा मच्छिमारांना आश्वासने देऊन खासदारांनी फसवणूक करण्याचे काम केले आहे.

सोनुर्लीतील महामार्ग ठेकेदाराच्या क्रशरवर हे खासदार गेले होते. त्यावेळी त्या क्रशरपासून होणारा त्रास नागरिकांनी दाखवून दिला होता.अवघ्या चार दिवसांत क्रशर बंद पाडू असे आश्वासन त्यावेळी त्यांनी स्थानिकांना दिले होते. तीही केवळ भूलथापच ठरली आहे, असेही परशुराम उपरकर यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Parshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्ग