शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
3
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
4
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
5
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
6
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
7
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
8
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!
9
हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी
10
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
11
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
12
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
13
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
14
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
15
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
16
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
17
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
18
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
19
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
20
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका

गडहिंग्लजच्या नगराध्यक्षांवर फौजदारी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2015 00:47 IST

हिरण्यकेशी प्रदूषणप्रश्न : नांगनूर येथील पाणी परिषदेत विजय देवणे यांचा इशारा

नूल : हिरण्यकेशी नदी प्रदूषित केल्याबद्दल गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा आणि नगरपालिकेचे मुख्याधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार असून, संकेश्वर कारखान्याचे अध्यक्ष रमेश कत्ती यांना शिवसेनेच्या स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी नांगनूर येथे दिला.गडहिंग्लज शहराचे सांडपाणी आणि संकेश्वराच्या हिरण्यकेशी साखर कारखान्याचे मळीमिश्रित पाणी हिरण्यकेशी नदीत सोडल्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. या प्रश्नावर शिवसेनेतर्फे नांगनूर येथे आयोजित पाणी परिषद ते बोलत होते. पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड, सुनील शिंत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड म्हणाले, दोन्ही राज्यांचे सरकार महाराष्ट्र शासन व स्थानिक ग्रामस्थ अशा तीन टप्प्यांवर या प्रश्नावर लढा उभा करावा लागेल. याप्रश्नी कृती समिती नेमून हिरण्यकेशीची पाहणी करू. कायद्याच्या भाषेत कर्नाटक-महाराष्ट्र शासनाला प्रदूषण पटवून देण्यासाठी दिल्लीतील केंद्रीय प्रदूषण मंडळाकडे तक्रार करणार आहे. गडहिंग्लजकरांच्या लढ्यात पर्यावरणवादी सक्रीय राहतील.प्रा. सुनील शिंत्रे, दिलीप माने, अनिल चौगुले, सीमा मोकाशी, दीपा शिंदे, शिवाजीराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. एल. एस. कोडोली यांनी प्रास्ताविक केले. निमंत्रक शाहू मोकाशी, अमोल नार्वेकर यांनी मेळाव्याचे आयोजन केले. मेळाव्यास श्रीरंग राजाराम, सागर तोडकर, सुरज हेब्बाळे, भरत जाधव, सरपंच सविता परीट, वसंत नाईक, किरण मोकाशी, प्रभाकर घोरपडे, रामचंद्र मोरबाळे, तानाजी नार्वेकर, विक्रांत नार्वेकर, अंजना रेडेकर उपस्थित होते. (वार्ताहर)पाणी परिषदेची पुढील दिशागुरूवारी (३० एप्रिल) नांगनूर, कडलगे, अरळगुंडीतील ग्रामस्थ नांगनूर बंधाऱ्यावर गंगापूजन करणार.रविवारी (३ मे) संबंधित गावे आणि तालुक्यातील शिवसेना महिला आघाडीला घेऊन गडहिंग्लज हिरण्यकेशी नदीपुलावर घागरींसह गंगापूजन. नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे, मुख्याधिकारी व पाणीपुरवठा समिती अध्यक्षांना समक्ष भेटून हा कार्यक्रम करणे.रविवारी (१० मे) संकेश्वर-गडहिंग्लज मार्गावर हिटणी येथे सीमेवर छ. शिवाजी महाराजांचा पुतळ्यासह महा रास्ता रोकोसाठी ठाण मांडणे.