शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

सी वर्ल्डसाठी पर्यायी जागा तयार

By admin | Updated: November 2, 2015 00:24 IST

प्रमोद जठार : जलचेतना परिषद जानेवारीत

कणकवली : सी-वर्ल्ड आता कोणा एकट्याच्या प्रतिष्ठेचा मुद्दा राहिलेला नाही. ती सिंधुदुर्गच्या प्रतिष्ठेची बाब आहे. कोणत्याही परिस्थितीत सीवर्ल्ड जिल्ह्याबाहेर जाऊ देणार नसून मालवणवासीयांना तो नको असेल तर पर्यायी जागा तयार आहे, असे माजी आमदार प्रमोद जठार यांनी येथील पत्रकार परिषदेत सांगितले. अमेरिकेतील ओरलॅँडो येथील सीवर्ल्डची पाहणी आगामी अमेरिका दौऱ्यात करणार असल्याचेही ते म्हणाले. जठार म्हणाले की, पुढील काही दिवसांत अमेरिकेतील फ्लोरिडा-ओरलॅँडो येथील सी-वर्ल्ड प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी जाणार आहे. त्याचबरोबर तेथील नासा सेंटर, डिस्ने लॅँड, युनिव्हर्सल स्टुडिओ आदी ठिकाणांची पाहणी करणार आहे. तोंडवळी येथे होणारा सी-वर्ल्ड प्रकल्प हा जिल्ह्याचे चित्र पालटून टाकेल. हा प्रकल्प सिंधुदुर्गात कोणत्याही किनाऱ्यावर होऊ दे. त्यात जिल्ह्याचे भवितव्य आहे. मात्र, तो सिंधुदुर्गातून जाणार नाही याची आपण हमी देतो. त्यासाठी पर्यायी जागेची पाहणी करून ठेवण्यात आली असून त्याबाबत मुख्यमंत्र्यांनाही माहिती दिलेली आहे. मुख्यमंत्र्यांनीही त्याला मंजुरी दिलेली आहे. जागेच्या प्रश्नामुळे आताच्या प्रकल्पाला कुठलीही परवानगी अद्याप मिळालेली नाही. भूसंपादनाशिवाय सामंजस्य कराराने जागा मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. सी वर्ल्डसाठी मेट्रो सी वर्ल्डच्या आराखड्यात मेट्रोचा समावेश असून चिपी विमानतळापासून ही मेट्रो सी वर्ल्डपर्यंत जोडली जाणार आहे. गोव्यातील मोपा ते चिपी आणि चिपी ते सी वर्ल्ड असे सर्किट तयार झाल्यास येथील परिसराचा झपाट्याने विकास होईल. सागरी महामार्ग केंद्राकडे सध्याचा सागरी महामार्ग राष्ट्रीय महामार्ग होण्याच्या मार्गावर असून तसा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. सागरी राष्ट्रीय महामार्ग दुपदरी असेल. प्रत्येक पाच किलोमीटरवर एक मोटेल असेल. किनाऱ्याकडे जाणारे रस्ते प्रशस्त होतील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांसाठी प्रत्येकी ५०० कोटी अशी १५०० कोटींची तरतूद या मार्गासाठी करण्यात येणार असल्याची माहिती जठार यांनी दिली. सेनेबाबत अपशब्द नाही सध्या शिवसेना-भाजपातील वाद विकोपास गेल्याबाबत छेडले असता जठार म्हणाले की, जोपर्यंत युतीचे सरकार आहे तोपर्यंत सिंधुदुर्गात कोणत्याही भाजप कार्यकर्त्याने शिवसेना कार्यकर्त्यांबाबत अपशब्द काढू नये, नाहीतर लोक आपणास हसतील. येत्या ५ नोव्हेंबर रोजी कणकवलीत होणारी जलचेतना परिषद जानेवारी महिन्यात होणार आहे. या परिषदेसाठी येणारे जलपुरूष डॉ. राजेंद्र सिंह महिनाभराच्या कालावधीसाठी परदेश दौऱ्यावर गेले असल्याने परिषद पुढे ढकलण्यात आल्याची माहिती जठार यांनी दिली. (प्रतिनिधी)