शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याकडून गाईच्या वासराचा फडशा, गावात भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 17:04 IST

भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्याने इन्सुली क्षेत्रफळवाडी येथील भरवस्तीतील गोठ्यात शिरून गाईच्या सहा महिन्यांच्या वासराचा फडशा पाडला. ही घटना रविवारी पहाटे घडली. या घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी वाडीतील ग्रामस्थांनी केली आहे.

ठळक मुद्दे बिबट्याकडून गाईच्या वासराचा फडशा, गावात भीतीचे वातावरण इन्सुली क्षेत्रफळवाडी येथील भरवस्तीतील घटना

बांदा : भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्याने इन्सुली क्षेत्रफळवाडी येथील भरवस्तीतील गोठ्यात शिरून गाईच्या सहा महिन्यांच्या वासराचा फडशा पाडला. ही घटना रविवारी पहाटे घडली. या घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी वाडीतील ग्रामस्थांनी केली आहे.इन्सुली क्षेत्रफळवाडी येथील शेतकरी अनंत यशवंत भिसे यांनी घरानजीकच्या गोठ्यात रात्री झोपण्यापूर्वी गाईच्या हंबरण्याचा आवाज ऐकला. त्यांनी गोठ्यात येत पाहिले असता गाय व वासरू सुखरूप होती. मात्र, भिसे यांच्या पत्नी रविवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास गाईचे दूध काढण्यासाठी गेल्या असता त्यांना वासरू दिसले नाही. त्यांना गोठ्यात रक्ताचे डाग दिसून आले.त्यांनी याबाबतची माहिती आपल्या पतीला दिली. भिसे यांनी गोठ्याशेजारी पाहणी केली असता वासराचे काही अवयव दिसून आले. दबा धरून बसलेल्या बिबट्याने पहाटेच्या सुमारास वासराचा फडशा पाडल्याचा प्राथमिक अंदाज भिसे यांनी व्यक्त केला.

वनविभागाला याबाबत माहिती दिल्यानंतर आजगाव वनपाल सी. व्ही. धुरी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. भिसे यांचे २ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद केले आहे. भरवस्तीपर्यंत बिबट्या येत असल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :leopardबिबट्याsindhudurgसिंधुदुर्ग