शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीत वाॅटर एटीएममध्ये भ्रष्टाचार; तीन लाखाच्या एटीएमची साडे नऊ लाखात खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 20:52 IST

Corruption : भ्रष्टाचार करण्यात झाल्याचा आरोप शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी केला आहे.

ठळक मुद्देसभागृहात या विषयावर चर्चा झाली असून याबाबतची निर्विदा प्रकिया आम्ही करत असलो तरी नगरविकास दर निश्चित करत असतो पण आपली तक्रार असल्यास बिल आदा केले जाणार नसल्याचे नगराध्यक्ष परब यानी लोबो यांना सागितले. 

सावंतवाडीत -सावंतवाडी नगरपालिकेने खरेदी केलेल्या वाॅटर एटीएममध्ये लाखो रूपयांचा भ्रष्टाचार असून हे एटीएम बाहेर तीन लाख रूपयाना एक मिळते मात्र तेच नगरपालिकेने  9 लाख 27 हजार रूपयाप्रमाणे तीन एटीएम  29 लाख 50 हजार रूपयांना खरेदी केल्याने यात लाखो रूपयांचा भ्रष्टाचार करण्यात झाल्याचा आरोप शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी केला आहे.त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सावंतवाडी नगरपालिकेने शहरातील तीन ठिकाणी वाॅटर एटीएम बसवली आहेत यात मच्छी मार्केट मुख्य भाजी मार्केट तसेच उद्यानात अशी तीन वाॅटर एटीएम म्हणजे एक रूपया भरून एक ग्लास पाणी या एटीएम मधून मिळणार आहे.यासाठी नगरपालिकेच्या स्थायी समितीत हा प्रस्ताव आणण्यात आला व याला स्थायीची मंजूरी घेण्यात आली. यावेळी स्थायीमध्ये शहरात तीन एटीएम बसविण्यासाठी 29लाख 50 हजार रूपयाच्या खर्चाला मान्यता देण्यात आली होती. त्या प्रमाणे निविदा प्रकिया करून शहरातील या तीन ठिकाणी ही एटीएम बसविण्यात ही आली आहेत.मात्र लोबो यांनी सदर एटीएम ची सखोल चौकशी केली असता हे बाहेर एका एटीएम ची किंमत 47 हजार रूपयांना मिळते पण येथे ते सुस्थीतीत उभारण्यात आल्याने त्याचा खर्च प्रत्येकी तीन लाख रुपयांपर्यंत जाईल अशी शक्‍यता लोबो यांनी व्यक्त केली. मात्र, एकदमच ते 9 लाख 27 हजार रूपयांना हे एक एटीएम खरेदी केल्याने धक्काच बसला असून नागरिकांचा पैसा असा वाया घालवू देणार नाही असा इशारा लोबो यानी दिला असून खरेदीचे बिल देण्यास विरोध केला आहे. दरम्यान सभागृहात या विषयावर चर्चा झाली असून याबाबतची निर्विदा प्रकिया आम्ही करत असलो तरी नगरविकास दर निश्चित करत असतो पण आपली तक्रार असल्यास बिल आदा केले जाणार नसल्याचे नगराध्यक्ष परब यानी लोबो यांना सागितले. नगरविकास मंत्र्यांकडे तक्रार करणार: लोबो 

या संपूर्ण व्यवहारांची सखोल चौकशी होण्यासाठी नगरविकास मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. याबाबत आम्ही आमदार दीपक केसरकर यांना विनंती केल्याचे लोबो यांनी सांगितले.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारatmएटीएमSawantwadiसावंतवाडीShiv SenaशिवसेनाDeepak Kesarkarदीपक केसरकर