शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार,आमदारांनी घेतले फैलावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 17:04 IST

मालवण : देवबागमधील पर्यटन व्यावसायिकांच्या बैठकीसाठी आलेल्या प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांना आमदार वैभव नाईक यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. बंदर ...

ठळक मुद्देबंदर विभागाच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार,आमदारांनी घेतले फैलावरसेनेच्या शिष्टमंडळाची कार्यालयात धडक

मालवण : देवबागमधील पर्यटन व्यावसायिकांच्या बैठकीसाठी आलेल्या प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांना आमदार वैभव नाईक यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. बंदर विभागाकडून ऐन पर्यटन हंगामात स्कुबा डायव्हिंग व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारल्याने शिवसेनेच्या शिष्टमंडळाने बंदर विभागाच्या कार्यालयावर धडक देत आरोपांच्या फैरी झाडल्या. गरमागरम झालेल्या चर्चेत आमदारांनी बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले.दरम्यान, आमदारांनी कार्यालयात प्रवेश केल्यानंतर प्रादेशिक बंदर अधिकारी यांनी खुर्चीवर बसूनच स्वागत केल्याने आमदार नाईक यांचा पारा चांगलाच चढला. आमदार आल्यावर तुम्हांला सन्मान देता येत नाही काय? असा सवाल करीत फैलावर घेतले.मालवण बंदर विभागाच्या कार्यालयात देवबाग येथील पर्यटन व्यावसायिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीकडे व्यावसायिकांनी पाठ फिरवली. याचवेळी अचानक आमदार वैभव नाईकांची शिवसेनेचे शिष्टमंडळाला घेऊन आक्रमक एन्ट्री झाली.

यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक पंकज साधये, मंदार केणी, लारा देसाई, सन्मेश परब, तपस्वी मयेकर, प्रवीण रेवंडकर, राजू मेस्त्री यांच्यासह अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर, अमोल ताम्हणकर, महाडिक यांच्याकडूनही आमदार नाईक यांनी आढावा घेत खडेबोल सुनावले. पर्यटन हंगामात बंदर विभागाकडून पर्यटन व्यावसायिकांना वेठीस धरले जात आहे. क्यार, महा, बुलबुल अशा चक्रीवादळाने पर्यटन व्यवसाय मेटाकुटीस आला असताना स्कुबा सिलिंडर जप्त करण्याची कारवाई पैसे उकळण्यासाठी केली जाते का? गेल्या पर्यटन बंदी कालावधीत कारवाईचा बडगा उगारून मलिदा गोळा केल्याचे आपल्याकडे व्यक्तिश: पुरावे असल्याचे आमदार नाईक यांनी सुनावले.पर्यटन हंगामाव्यतिरिक्त व्यावसायिकांकडे वेळ असतानाही ते व्यवसाय अधिकृत करण्यासाठी प्रयत्न करीत नाहीत आणि हंगामात खुलेआम व्यवसाय करतात. पर्यटकांची सुरक्षितता विचारात घेता बंदर विभागाला सहकार्य केल्यास आमच्याकडून स्कुबा व्यवसाय करण्यासाठी सहकार्य मिळेल, असे कॅप्टन सूरज नाईक यांनी स्पष्ट केले.पर्यटन व्यावसायिकांच्या बंदर विभागाकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर कार्यवाही होणे आवश्यक आहे. केवळ दंडात्मक कारवाईला कोणताही अर्थ नसून त्यांना कागदपत्रांची पूर्तता करून रितसर परवानगी देण्यात यावी.समस्यांकडे गृहमंत्र्यांचे लक्ष वेधणारमालवणसह सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील वॉटरस्पोर्ट्स व अन्य पर्यटन व्यावसायिकांना कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर परवानगी मिळावी. स्कुबा व्यवसायाबाबतही धोरण निश्चित व्हावे. कारवाईतही नियमितता असावी. पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या दूर व्हाव्यात. याबाबत राज्याचे गृह व बंदर विकास मंत्री यांच्यासोबत पुढील आठवड्यात बैठक घेणार असल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले.

मालवण समुद्रात खडकाळ भाग असलेल्या ठिकाणी दिशादर्शक बोया बसविण्यासाठी नाईक यांच्या पाठपुराव्यानंतर निधी उपलब्ध झाला. मात्र बोया बसविण्याची कार्यवाही बंदर विभागाकडून केली जात नाही. दोन महिन्यांपूर्वी समुद्रात एक बोट खडकावर आदळून मोठे नुकसान झाले. यापुढेही असे अपघात घडण्याची वाट बंदर विभाग बघत आहे का? असा सवाल तालुकाप्रमुख खोबरेकर, जोगी यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :Vaibhav Naikवैभव नाईक sindhudurgसिंधुदुर्ग