शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Unlock : कणकवलीतील काही दुकाने सुरू, खरेदीसाठी ग्राहकही उपस्थित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 16:39 IST

कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी गुरुवारी एक, दोन दुकाने वगळता कणकवली बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र, ज्यांना दुकाने सुरू ठेवायची आहेत त्यांनी प्रशासनाचे नियम पाळून ती चालू ठेवावीत, असे व्यापारी संघाने जाहीर केल्यानंतर शुक्रवारी बाजारपेठेतील काही दुकाने पूर्वीप्रमाणे सुरू झाली होती. त्यामुळे काही ग्राहक बाजारपेठेत खरेदीसाठी दाखल झाले होते.

ठळक मुद्देकणकवलीतील काही दुकाने सुरू, खरेदीसाठी ग्राहकही उपस्थित काळजी घेण्याचे व्यापारी संघाचे आवाहन

कणकवली : कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी गुरुवारी एक, दोन दुकाने वगळता कणकवली बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र, ज्यांना दुकाने सुरू ठेवायची आहेत त्यांनी प्रशासनाचे नियम पाळून ती चालू ठेवावीत, असे व्यापारी संघाने जाहीर केल्यानंतर बाजारपेठेतील काही दुकाने पूर्वीप्रमाणे सुरू झाली होती. त्यामुळे काही ग्राहक बाजारपेठेत खरेदीसाठी दाखल झाले होते.कणकवली शहर तसेच तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्यासाठी कणकवली शहरातील स्वयंसेवी संस्था, कणकवली तालुका व्यापारी संघ यांनी स्वयंस्फूर्तीने ३० जूनपर्यंत कणकवली बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे गुरुवारी कणकवली बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र, काही व्यापारी तसेच विक्रेते यांनी या बंदला असहमती दर्शविली होती.

लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवाच फक्त सुरू होत्या. त्यामुळे कापड दुकानदार, स्टेशनरी, भांडी विक्रेते अशी अनेक दुकाने बंद होती. त्यामुळे त्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते. ही बाब या व्यापाऱ्यांनी व विक्रेत्यांनी व्यापारी संघाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर गुरुवारी रात्री व्यापारी संघाने दुकाने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला होता.दुकाने उघडण्याचा निर्णय ऐच्छिकसोशल डिस्टन्सिंग ठेवून तसेच प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळून ग्राहकांना सेवा देण्यास कणकवली तालुका व्यापारी संघाने मुभा दिली आहे. आपली दुकाने उघडायची किंवा नाही हा निर्णय व्यापाऱ्यांसाठी ऐच्छिक ठेवला आहे. त्यामुळे शुक्रवारी कणकवली बाजारपेठेतील अनेक दुकाने उघडण्यात आली होती. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजारsindhudurgसिंधुदुर्ग