शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
4
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
5
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
6
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
7
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
8
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
9
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
10
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
11
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
12
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
13
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
14
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
15
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
16
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
17
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
18
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
19
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
20
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक

CoronaVirus : कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांना सावंतवाडीत ठेवण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 17:32 IST

सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथील दोघे युवक कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्यानंतर त्यांना सावंतवाडी कुटीर रूग्णालयातच दाखल करण्यात येणार होते. मात्र स्थानिक नागरिकांसह नगराध्यक्ष संजू परब यांनी या रूग्णांना कुटीर रूग्णालयात ठेवण्यास विरोध केला. त्यामुळे या युवकांना अखेर ओरोस जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे. हा प्रकार गुरूवारी दुपारी कुटीर रूग्णालय परिसरात घडला आहे.

ठळक मुद्देकोरोना पॉझिटिव्ह रूग्णांना सावंतवाडीत ठेवण्यास विरोधनगराध्यक्षांची मध्यस्थी : अखेर रूग्णांना ओरोसला हलविले

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथील दोघे युवक कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्यानंतर त्यांना सावंतवाडी कुटीर रूग्णालयातच दाखल करण्यात येणार होते. मात्र स्थानिक नागरिकांसह नगराध्यक्ष संजू परब यांनी या रूग्णांना कुटीर रूग्णालयात ठेवण्यास विरोध केला. त्यामुळे या युवकांना अखेर ओरोस जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे. हा प्रकार गुरूवारी दुपारी कुटीर रूग्णालय परिसरात घडला आहे.सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथील दोन युवक कोरोना पॉझिटिव्ह मिळाले आहेत. ते मुुंबई येथून कारिवडेत आले होते. त्यानंतर त्यांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. मात्र आज त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना तत्काळ सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र कोरोना रूग्ण सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयात हलवत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांना समजली.त्यानंतर उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी याला प्रथम विरोध केला. तसेच माजी नगरसेवक आरेकर तसेच रिक्षाचालक यांनी मिळून वैद्यकीय अधीक्षक उत्तम पाटील यांना कोरोना रूग्ण येथे ठेवू नका, असे सांगितले.दरम्यान रूग्णालय प्रशासन ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने नागरिकांनी नगराध्यक्ष संजू परब यांना बोलावून घेतले. नगराध्यक्ष परब यांच्यासह उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक मनोज नाईक, सुधीर आडिवरेकर यांनी रूग्णालय अधीक्षक पाटील यांना याबाबत जाब विचारला.ओरोस येथे जर कोरोना रूग्ण ठेवण्याची व्यवस्था असेल तर हे रूग्ण सावंतवाडीत का ठेवता असा सवाल केला. यावर डॉ.पाटील यांना नागरिकांचा असलेला विरोध बघून जिल्हा शल्य चिकित्सक धनजंय चाकूरकर यांच्याशी संपर्क केला आणि त्यांना घटनेची माहीती दिली. त्यानंतर सदर रूग्ण ओरोस जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले.नगराध्यक्ष परब यांनी समन्वयाची भूमिका घेत यावर तोडगा काढला. यावेळी राजू धारपवार, संतोष मुळीक, रफिक शेख, प्रसाद कोरगावकर, सुनिल होडवडेकर, सुहास सावंत आदी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSawantwadiसावंतवाडीsindhudurgसिंधुदुर्ग