शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : गोंधळी समाजावर आली उपासमारीची वेळ, लॉकडाऊनमुळे फिरती झाली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 15:46 IST

गोंधळी समाजाचे हातावरचे पोट असून ते भाड्याच्या घरात राहून मिळेल तिथे आपले वास्तव्य करीत आहेत. गोंधळी समाज हा गावोगावी फिरून भांडी विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतो.

ठळक मुद्दे गोंधळी समाजावर आली उपासमारीची वेळ, लॉकडाऊनमुळे फिरती झाली बंद अत्यावश्यक सेवेत समावेश करण्याची केली जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

तळेरे : गोंधळी समाजाचे हातावरचे पोट असून ते भाड्याच्या घरात राहून मिळेल तिथे आपले वास्तव्य करीत आहेत. गोंधळी समाज हा गावोगावी फिरून भांडी विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतो.सध्या सुरू असलेल्या कोरोना साथीमुळे गेले तीन महिने संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन असल्याने समाजाला बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यातूनच गेले तीन महिने फिरता व्यवसाय बंद झाल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

आपल्या स्तरावरून समाजासाठी ठोस धोरण आखून पुन्हा व्यवसाय होण्यासाठी योग्य ती मदत करावी, अशी मागणी कणकवली तालुका गोंधळी समाजाचे अध्यक्ष शशिकांत इंगळे यांनी सिंधुदुर्गजिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी व पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे करून समाजाच्यावतीने लेखी निवेदनही सादर केले आहे.जगण्याचा पर्याय म्हणून समाजातील काही लोक गेल्या पंधरा दिवसांपासून अत्यावशक वस्तू म्हणजेच भाजीपाला विकून आपले कुटुंब चालवीत होते. परंतु ह्या कोरोना या रोगामुळे खेड्यापाड्यांपासून गावचे सरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामस्थांकडून फिरून भाजी विक्री करण्यास विरोध होत असल्याने समाजावर उपासमारीचे दिवस आले आहे.

आमच्या व्यवसायाला अत्यावश्यक सेवेमधील असणारे व्यवसाय म्हणून मान्यता द्यावी व उदारनिर्वाहाचे मार्गदर्शन करावे जेणेकरून गोंधळी समाजाचा पोटापाण्याचा प्रश्न सुटेल. तरी योग्य विचार करून गोंधळी समाजाला न्याय द्यावा, असे या निवेदनात म्हटले आहे.हे निवेदन उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी स्वीकारले. याप्रसंगी गोंधळी समाज तालुका अध्यक्ष शशिकांत इंगळे, सल्लागार बसवराज सूर्यवंशी, भैरीनाथ कांबळे, राजू इंगळे, माणिकराज वाघमारे हे उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गcollectorजिल्हाधिकारी