शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार
4
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
5
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
6
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
7
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
8
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
9
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
10
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
11
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
12
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
13
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
14
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
15
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
16
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
17
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
18
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
19
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
20
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

CoronaVirus Lockdown : नरडवे धरणावरील कामगार निघाले चालत गावी, कणकवली तहसीलदारांनी दिला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 17:48 IST

पावसाळा तोंडावर आल्याने तसेच उपासमार होऊ लागल्याने पुणे व लातूर जिल्ह्यात चालत निघालेल्या कामगारांना करूळ व दाजीपूरच्या चेकपोस्टवरून कणकवली तहसील कार्यालयात आणण्यात आले.

ठळक मुद्देनरडवे धरणावरील कामगार निघाले चालत गावीकणकवली तहसीलदारांनी दिला आधार

कणकवली : पावसाळा तोंडावर आल्याने तसेच उपासमार होऊ लागल्याने पुणे व लातूर जिल्ह्यात चालत निघालेल्या कामगारांना करूळ व दाजीपूरच्या चेकपोस्टवरून कणकवली तहसील कार्यालयात आणण्यात आले.

नरडवे धरण प्रकल्पाचे काम लॉकडाऊनमुळे बंद पडले आहे. त्यातच या प्रकल्पाच्या ठेकेदाराकडून कामगारांशी संपर्क बंद झाला. त्यामुळे नरडवे ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी तीन ते चारवेळा मोफत जीवनावश्यक साहित्य दिल्याने कशीतरी गुजराण तेथील कामगारांची सुरू होती. कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांनी या कामगारांच्या तात्पुरत्या निवार्‍याची व जेवणाची व्यवस्था केली. नरडवे धरण ठेकेदार व पाटबंधारे विभागाकडून बेदखल झालेल्या या कामगारांना कणकवली तहसीलदारानी आधार दिला आहे.नरडवे धरण प्रकल्पाच्या कामासाठी नाशिक येथील ठेकेदाराने पुणे जिल्ह्यातील शिरूर, चाकण व लातूर येथील कामगारांना कामासाठी आणले होते. धरण प्रकल्पामध्ये झोपड्या बांधून हे कामगार काम करत होते. दोन्ही जिल्ह्यातील मिळून ३७ महिला, पुरूष व लहान मुले नरडवे धरण प्रकल्पस्थळी राहत होती.

लॉकडाऊननंतर काही दिवस काम झाले, त्यानंतर प्रकल्पाचे काम पूर्ण बंद करण्यात आल्याने या कामगार कुटुंबांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला. दोन महिने लॉकडाऊनमध्ये अडकल्यानंतर गावी कसे जायचे? हा प्रश्‍न या कुटुंबासमोर निर्माण झाला होता.दोन दिवसांपूर्वी नरडवे परिसरात वादळी वार्‍यासह पाऊस कोसळला होता. त्यात कामगार कुटुंबांच्या झोपड्या कोसळल्या. पावसात भिजतच रात्र या कुटुंबांनी काढली. पावसाळा तोंडावर आल्याने येथे राहण्यापेक्षा गावी गेलेले बरे या विचारातून दोन दिवसांपूर्वी हे कामगार कुटुंबिय चालत निघाले होते. लातूरकडे जाणारे कामगार फोंडाघाटातून दाजीपूरला पोहोचले, तर पुणे जिल्ह्यात जाणारे कामगार पाचलच्या दिशेने निघाले होते.त्यांना चेकपोस्टवर अडविल्यानंतर त्यांची माहिती कणकवली तहसील कार्यालयाला देण्यात आली. त्यानंतर तहसीलदार आर. जे. पवार यांनी दोन मिनिबस पाठवून त्या कामगारांना कणकवली येथे आणले. त्यानंतर या सर्व कामगारांची कणकवली नगरपंचायतीच्या मुडेश्‍वर मैदानजवळील पर्यटन सुविधा केंद्रात व्यवस्था करण्यात आली. इमारतीची तातडीने साफसफाई करून तेथे कामगारांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. 

सर्व कुटुंबांना पुढील काही दिवसांसाठी पुरेल एवढे जीवनावश्यक साहित्य तसेच मुलांना खाऊ वितरित करण्यात आल्याचे तहसीलदार आर. जे. पवार यांनी सांगितले. दरम्यान, या कामगारांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी आता व्यवस्था करण्यात येणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग