शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : निरवडेतील साई होली फेथ स्कूलची इमारत क्वारंटाईनसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 16:01 IST

चाकरमान्यांना क्वारंटाईन करण्यासाठी जिल्हा परिषद शाळा, इमारती कमी पडत आहेत. अशा या परिस्थितीत सावंतवाडी तालुक्यातील निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूल (साई होली फेथ हायस्कूल), दर्शन विद्या एज्युकेशन संस्था संचलितची इमारत शाळेचे अध्यक्ष डॉ. शेखर जैन यांनी निरवडे ग्रामपंचायत प्रशासनास क्वारंटाईनसाठी दिली.

ठळक मुद्देनिरवडेतील साई होली फेथ स्कूलची इमारत क्वारंटाईनसाठी ग्रामपंचायत प्रशासनाला हातभार

रामचंद्र कुडाळकर तळवडे : देशात सध्या कोरोना विषाणू थैमान घालत आहे. त्याच्या प्रतिबंधासाठी राज्य सरकार चांगल्या प्रकारे काम करीत आहे. पुणे, मुंबई येथून चाकरमानी आपल्या गावी येत आहेत. या चाकरमान्यांना क्वारंटाईन करण्यासाठी जिल्हा परिषद शाळा, इमारती कमी पडत आहेत. अशा या परिस्थितीत सावंतवाडी तालुक्यातील निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूल (साई होली फेथ हायस्कूल), दर्शन विद्या एज्युकेशन संस्था संचलितची इमारत शाळेचे अध्यक्ष डॉ. शेखर जैन यांनी निरवडे ग्रामपंचायत प्रशासनास क्वारंटाईनसाठी दिली.सध्या परजिल्ह्यातून तसेच मुंबई येथून मोठ्या संख्येने लोक गावाकडे येत आहेत. गावागावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच माध्यमिक विद्यालय आणि खासगी संस्था इमारतीत या सर्वांना क्वारंटाईत केले जात आहे.मात्र, सध्या जागेची कमतरता असल्याने व मुबलक सुविधा ग्रामीण भागातील शाळात नसल्याने काही ठिकाणी चाकरमान्यांना त्रास होत आहे. याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक आपली काळजी घेताना दिसत आहेत. काही समाजसेवक आपल्यापरीने सहकार्य करीत आहेत.निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूल (साई होली फेथ हायस्कूल)चे अध्यक्ष डॉ. शेखर जैन यांनी कोरोना संक्रमण काळात आपल्या स्कूलची इमारत निरवडे ग्रामपंचायत प्रशासनाला लोकांना क्वारंटाईनसाठी मोफत वापरण्यास दिली.  जिल्ह्यातही असे समाजसेवक पुढे सरसावले तर मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होऊ शकते.

मी माझ्या संस्कार नॅशनल स्कूल (साई होली फेथ हायस्कूल)ची इमारत कोरोना काळात निरवडे ग्रामपंचायतीला मोफत दिली आहे. मुंबई, पुणे येथील चाकरमान्यांना १४ दिवस क्वारंटाईन करण्यासाठी तिचा वापर करण्यात येणार आहे. आज जिल्ह्यात सरकारी यंत्रणेजवळ ज्या इमारती आहेत त्या सध्या कमी पडत आहेत. आज समाजातील सर्वच व्यक्तींनी सरकारला सहकार्य करणे गरजेचे आहे.- डॉ. शेखर जैन, अध्यक्ष, दर्शन विद्या एज्युकेशन संस्था 

निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूलचे अद्यक्ष डॉ. शेखर जैन यांनी निरवडे ग्रामपंचायत प्रशासनाला आपल्या स्कूलची इमारत मोफत देऊन निरवडे ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांना चांगले सहकार्य केले आहे. आम्ही इमारतीची मागणी केली असता त्यांनी लगेच सहकार्य करून खºया मानवधर्माचे पालन केले आहे.- प्रमोद गावडे, सरपंच, ग्रामपंचायत निरवडे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग