शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सहकारी संस्थांकडून ५८ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 16:44 IST

ओरोस : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रयत्न करीत असताना शासनाला आर्थिक कमतरता भासू नये यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक, ...

ठळक मुद्देमुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सहकारी संस्थांकडून ५८ लाखधनादेश पालकमंत्र्यांकडे केला सुपुर्द

ओरोस : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रयत्न करीत असताना शासनाला आर्थिक कमतरता भासू नये यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक, अधिकारी-कर्मचारी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकारी संस्थांनी ५८ लाख ९ हजार ६०० रुपयांचा निधी कोविड-१९ मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला आहे.

याचा धनादेश पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. हा निधी देऊन सहकार क्षेत्र सरकारच्या मागे असल्याचे दाखविण्याची किमया जिल्हा बँकेने केली असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्र्यांनी काढले.सिंधुदुर्ग जिल्हा बँक, बँकेचे अधिकारी व कर्मचारी, जिल्ह्यातील सहकारी संस्था यांच्या सहकार्याने ह्यकोविड-१९ मुख्यमंत्री सहाय्यता निधीह्ण मदत धनादेश सुपुर्द कार्यक्रम जिल्हा बँकेच्या सभागृहात पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, उपाध्यक्ष सुरेश दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, अतुल रावराणे, बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर, गुलाबराव चव्हाण, प्रज्ञा परब आदी उपस्थित होते.संपूर्ण देशात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूला रोखण्यासाठी शासन आवश्यक त्या उपाययोजना करीत आहे. तसेच शासनाने या विषाणूविरोधात लढा देण्यासाठी आवश्यक ते उपाय करण्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी कोविड-१९ मुख्यमंत्री सहाय्यता निधी जमा करण्याचे आवाहन शासनाने केले आहे. त्यानुसार राज्यात विविध संस्था, राजकीय व्यक्ती, लहान मुलेदेखील आर्थिक मदत करीत आहेत.त्याचप्रमाणे कोविड-१९ मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत करण्याचा निर्णय जिल्हा बँक आणि सहकारी संस्थांनी घेत तब्बल ५८ लाख ९ हजार ६०० रुपयांचा निधी जमा केला आहे.यात सिंधुदुर्ग जिल्हा बँक २५ लाख रुपये, सिंधुदुर्ग बँक अधिकारी व कर्मचारी ७ लाख २ हजार रुपये तर सहकारी संस्था १३ लाख २७ हजार ६०० रुपये तर विविध संस्थांकडे एनइएफटीच्या माध्यमातून जमा झालेल्या १२ लाख ८० हजार रुपयांचा समावेश आहे. सोमवारी विविध संस्थांकडील मदतनिधीचे धनादेश पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.

यावेळी उदय सामंत म्हणाले, कोरोनापासून मुक्तता होण्यासाठी सर्वांनी संयम आणि शासनाच्या सूचनांचे पालन करावे. यावेळी जिल्हा बँकेचे नाव हे राज्यातील आदर्शवत बँकांमध्ये येत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच या बँकेने सहकार क्षेत्र हे सरकारच्या पाठीशी आहे हे ५८ लाखांची मदत करून दाखवून दिले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप करणारशासनाच्या आयुष संस्थेमार्फत रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या होमिओपॅथिक गोळ्या दिल्या जाणार आहेत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील साडेसात लाख कुटुंबातील २५ लाख लोकांना या गोळ्या दिल्या जाणार आहेत.

तीन दिवसांचा गोळ्यांचा डोस असून ३ कोटी गोळ्या उपलब्ध झाल्या आहेत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात या गोळ्या शासनामार्फत मोफत दिल्या जाणार असून मोफत गोळ्या वाटप करणारे हे राज्यातील पहिले जिल्हे असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरासिंधुदुर्ग जिल्हा बँक सभागृहात कोविड १९ मुख्यमंत्री सहाय्यता निधी मदत धनादेश सुपुर्द कार्यक्रम पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी उपस्थित होत्या. मात्र या कार्यक्रमास सेना पदाधिकारी यांच्यासह सहकारी बँक संचालक व विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तेथे गर्दी एवढी होती की सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजल्याचे दिसून आले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गBanking Sectorबँकिंग क्षेत्र