शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : चिपीवरून विमानाचे टेकआॅफ लॉकडाऊनमुळे दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 12:14 IST

लॉकडाऊनमुळे विमानसेवा बंद असल्याने चिपी विमानतळासाठी आवश्यक असणाऱ्या काही मशिनरी युरोपीय देशातून आणता येणार नसल्याने चिपी विमानतळाचे काम पुन्हा एकदा रखडलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा परिणाम चिपी विमानतळावरदेखील दिसून आला आहे. त्यामुळे चिपीवरून विमानाचे टेक आॅफ सध्या दूरच आहे.

ठळक मुद्देचिपीवरून विमानाचे टेकआॅफ लॉकडाऊनमुळे दूरआवश्यक असणाऱ्या मशिनरी युरोपीय देशात अडकल्या

जनीकांत कदम कुडाळ : लॉकडाऊनमुळे विमानसेवा बंद असल्याने चिपी विमानतळासाठी आवश्यक असणाऱ्या काही मशिनरी युरोपीय देशातून आणता येणार नसल्याने चिपी विमानतळाचे काम पुन्हा एकदा रखडलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा परिणाम चिपी विमानतळावरदेखील दिसून आला आहे. त्यामुळे चिपीवरून विमानाचे टेक आॅफ सध्या दूरच आहे.सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असून या जिल्ह्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या चिपी विमानतळाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.

हा विमानतळ १ मे रोजी सुरू करण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी जाहीर केले होते. त्यादृष्टीने प्रशासनानेही काम सुरू केले होते. मात्र, हा विमानतळ सुरू होण्यासाठी याठिकाणी आवश्यक असणारे पाणी, विद्युत सोयी सुविधा तसेच इतर काही मशिनरी व त्यानंतर विमानतळ सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी परवानगी या सर्व प्रलंबित गोष्टी कशा पूर्ण होतील.

यासाठी आयआरबी कंपनी व प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत होते. खासदार विनायक राऊत यांनीही याकरिता पाठपुरावा सुरू केला होता. त्यामुळे १ मे रोजी हा विमानतळ सुरू होईल अशा आशा पल्लवित झाल्या होत्या.दरम्यान, जगभर थैमान घातलेल्या कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता बहुतांशी देशात संचारबंदी करण्यात आली आहे. तसेच विमान, रेल्वे व इतर वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे याचा परिणाम सर्व क्षेत्रांवर दिसून येत आहे.आवश्यक असलेल्या मशिनरी बाहेरच्या देशातून चिपी विमानतळ येथे येऊ शकत नसल्यामुळे विमानतळ आता केव्हा सुरू होईल याबाबत सध्यातरी अनिश्चितता आहे. चिपी विमानतळ प्रकल्प १ मे पासून सुरू होईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ते सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आले असताना केली होती. मात्र, मार्च महिन्यापासूनच संपूर्ण भारतात लॉकडाऊन झाल्यामुळे सर्वच प्रकल्प बंद पडले. त्यामुळे यावर्षी तरी चिपी विमानतळ प्रकल्प सुरू होण्याची आशा धुसर झाली आहे.

आता पावसाळा आहे. त्यामुळे चार महिने चिपी विमानतळाचे उर्वरित काम बंद राहणार आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा मोठा फटका चिपी विमानतळ प्रकल्पाला बसला आहे.मशिनरी सध्यातरी येणार नाहीतसंचारबंदी असल्यामुळे युरोपीय देशातून विमानतळासाठी आवश्यक असणाऱ्या मशिनरी आता आणणे सध्यातरी शक्य होणार नाही. यामध्ये एक्स-रे मशीन, स्कॅनर, सिक्युरिटी सिस्टीम तसेच इतर काही मशिनरींचा समावेश आहे.या मशिनरी युरोपीय देशातून आणण्यात येणार होत्या. मात्र, लॉकडाऊनमुळे विमानसेवा बंद असल्यामुळे या मशिनरी सध्यातरी चिपी विमानतळ येथे आणता येणार नाही. त्यामुळे चिपी विमानतळाचे उर्वरित काम मात्र रखडले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग