शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : कॅनिंग व्यावसायिकांकडून १४ रूपयांचा माफक दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 14:12 IST

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देवगड आंबा बागायतदारांनी स्वत:च्या मालाची स्वत:च विक्री करून विक्रीचा एक नवीन पायंडा रचून दलालाच्या विळख्यातून सुटकेचा श्वास घेतला. मात्र असे असताना आंबा कॅनिंग व्यावसायिकांकडून १४ रुपये प्रतिकिलो माफक दराने आंबा खरेदी करून बागायतदारांची पूर्णत: पिळवणूक केली जात आहे.

ठळक मुद्देकॅनिंग व्यावसायिकांकडून १४ रूपयांचा माफक दरकोरोनाची पार्श्वभूमीवर बागायतदारांची पूर्णत: पिळवणूक

अयोध्याप्रसाद गावकर देवगड : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देवगड आंबा बागायतदारांनी स्वत:च्या मालाची स्वत:च विक्री करून विक्रीचा एक नवीन पायंडा रचून दलालाच्या विळख्यातून सुटकेचा श्वास घेतला. मात्र असे असताना आंबा कॅनिंग व्यावसायिकांकडून १४ रुपये प्रतिकिलो माफक दराने आंबा खरेदी करून बागायतदारांची पूर्णत: पिळवणूक केली जात आहे.कोरोना विषाणूने देशामध्ये प्रवेश केल्यानंतर २२ मार्चपासून संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन सुरू झाले. सुरूवातीच्या लॉकडाऊनच्या आठ दिवसांच्या कालावधीमध्ये बागायतदारांचे थोड्या फार प्रमाणात नुकसान झाले होते कारण वाशी मार्केट पूर्णत: बंद ठेवण्यात आले होते.

यानंतर राज्यभरातून व परराज्यातून देवगडमधील आंबा बागायतदारांना आंबा खरेदीसाठी थेट ग्राहक संपर्क करून आंब्यांची मागणी होऊ लागली. शेतकरी ते ग्राहक असे एक समीकरण बनले यातून बागायतदारांना दलाली नसल्याने फायदा होऊ लागला.कोरोनाने देवगडमधील आंबा बागायतदारांना स्वत:चा माल स्वत:च विक्री करून स्वावलंबी बनविले. मात्र कॅनिंग व्यावसायिकांकडून १४ रुपये प्रति किलो दराने आंबा खरेदी करून बागायतदारांची पिळवणूक केली जात आहे.

सुरूवातीला १० दिवसांपूर्वी देवगड तालुक्यातील कॅनिंग व्यवसाय सुरू झाला, त्यावेळी २० रुपये प्रति किलो कॅनिंग आंबा घेतला जात होता. कॅनिंगचा आंब्यांवर प्रक्रिया उद्योग करणारे कारखाने व घरगुती उपाय नसल्याचा फायदा घेऊन कॅनिंग कंपन्या बागायतदारांचा आंबा माफक दराने १४ रुपयेप्रमाणे खरेदी करीत आहेत.

लाखो व कोट्यवधी रुपये खर्च करून प्रत्येक तालुक्यामध्ये राज्य कृषी व पंचायत समिती कृषी विभागाची कार्यालये थाटली असताना माफक दरात कॅनिंग घेणाऱ्या कंपन्यांवर का कारवाई होत नाही असा सवाल बागायतदारांमधून व्यक्त होत आहे.आंबा कॅनिंगचा दर किमान ३0 रूपये प्रति किलो हवागतवर्षी २८ रुपये प्रति किलोने कॅनिंगचा आंबा याचवेळी घेतला जात होता. हा आंबा पल्प, बर्फी, ज्युस व आंब्यावर बनविले जाणारे पदार्थ तयार करण्यासाठी वापरला जातो.१ किलो आंब्यापासून आंबा पल्प बनविला तर तो ज्युस बाजारात प्रति १५० रुपये किलोने विकला जातो. आंब्यावर ज्युस बनविणाऱ्या प्रक्रियेला ४० रुपये प्रति किलो खर्च येतो व वाहतुकीचा खर्च प्रति बॉटलमागे ५ रुपये आहे. यामुळे १४ रुपये किलो आंबा, ४५ रुपये प्रक्रिया व वाहतूक खर्च एकूण निर्मितीमूल्य ५९ रुपये होते.मात्र याच आंब्याची ज्युसची बॉटल १५० रुपये किंमतीने विक्री केली जाते. कॅनिंग कंपनी व प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना प्रति बॉटल ८० रुपये फायदा मिळत आहे. तर उत्पादन घेणारा बागायतदाराच्या हातात मात्र उत्पन्नापेक्षा खर्च जास्त अशी स्थिती होत आहे. किमान ३० रुपये प्रति किलो दराने आंबा कॅनिंग घेण्यात यावी, अशी मागणी बागायतदारांमधून केली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMangoआंबाsindhudurgसिंधुदुर्ग