शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : अर्धवेळ परिचारिकांचे घंटानाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 12:58 IST

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रांसमोर अर्धवेळ पारिचारिका कर्मचारी संघटनेच्यावतीने घंटानाद आंदोलन छेडण्यात आले. जिल्ह्यात हे आंदोलन १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा रावजी यादव आणि अर्धवेळ परिचारिका कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा मनिषा परब यांनी केला आहे.

ठळक मुद्देअर्धवेळ परिचारिकांचे घंटानाद आंदोलनजिल्ह्यात आंदोलन १०० टक्के यशस्वी

ओरोस : आरोग्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या अर्धवेळ परिचारिकांनाही आशा स्वयंसेविकांप्रमाणेच प्रोत्साहन भत्ता व विमा संरक्षण जाहीर करण्यात यावे, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रांसमोर अर्धवेळ पारिचारिका कर्मचारी संघटनेच्यावतीने घंटानाद आंदोलन छेडण्यात आले. जिल्ह्यात हे आंदोलन १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा रावजी यादव आणि अर्धवेळ परिचारिका कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा मनिषा परब यांनी केला आहे.राज्यभरात १०६०० अर्धवेळ परिचारिका कार्यरत आहेत. दिवसाला १०० प्रमाणे महिन्याला ३००० रुपये मानधन त्यांना दिले जाते. त्यांची कामाची वेळ ही दुपारी २ पर्यंत आहे. मात्र, कोरोनाच्या लढ्यात दिवस-रात्र काम करणाऱ्या आरोग्य सेविकांसोबत त्याही जीवाची बाजी लावून काम करीत आहेत. सद्यस्थितीत अर्ध्या पगारात पूर्ण वेळ काम करण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे.या कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे फिरतीसाठी आगावू मदतही सरकारकडून दिली गेलेली नाही. त्यामुळे अर्धपोटी राहून कोरोनाचा मुकाबला कसा करावा असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.गावात नवीन कोण आले आहेत का? त्यांना काही त्रास होतो आहे का? कोरोनाची लक्षणे आहेत का? असल्यास त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविणे अशी कामे त्या करीत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा थेट रुग्णाशी संबंध येतो.

३१ मार्च रोजी ग्रामविकास विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयाप्रमाणे या अर्धवेळ परिचारिकांना प्रोत्साहनभत्ता किंवा विमा संरक्षण देण्याबाबत कोणताही उल्लेख नाही. हा त्यांच्यावरील फार मोठा अन्याय असून शासन दुजाभाव करीत असल्याचा आरोप कण्यात आला आहे.३ मेपर्यंत प्रोत्साहन भत्ता व विमा संरक्षण लागू करण्यात यावे तसेच फेब्रुवारी व मार्च महिन्यांचा पगार बँक खात्यात जमा करण्यात यावा. अन्यथा ४ मे पासून आरोग्य सेविकेसोबतची फिरती बंद करून उपकेंद्राच्या प्रवेशद्वारावर काळया फिती लावून कुटुंबातील सदस्यांसह घंटानाद आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा देण्यात आला होता.त्यानुसार कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील अर्धवेळ परिचारिका सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग