शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : मध्यप्रदेश, बिहारमधील परप्रांतीय कामगार  पळून जाण्याच्या प्रयत्नात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 16:49 IST

परप्रांतीय कामगारांची घुसमट झाली आहे. गोवा राज्यात अडकलेल्या कामगारांनी चोरट्या मार्गाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश केला. तसेच येथील मिळून ८३ कामगार एका ट्रकमधून जात असताना कुडाळ तालुक्यातील झाराप महामार्ग येथे त्यांना ताब्यात घेण्यात आले.

ठळक मुद्देमध्यप्रदेश, बिहारमधील परप्रांतीय कामगार पळून जाण्याच्या प्रयत्नात ट्रक झारापजवळ पोलिसांनी पकडला, कामगारांची घुसमट

सावंतवाडी : परप्रांतीय कामगारांची घुसमट झाली आहे. गोवा राज्यात अडकलेल्या कामगारांनी चोरट्या मार्गाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश केला. तसेच येथील मिळून ८३ कामगार एका ट्रकमधून जात असताना कुडाळ तालुक्यातील झाराप महामार्ग येथे त्यांना ताब्यात घेण्यात आले.परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रकसह ८३ कामगारांना सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने महसूल विभागाचे दंडाधिकारी तथा तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी ताब्यात घेतले. यातील बहुतांश कामगार हे मध्यप्रदेश आणि बिहार राज्यातील आहेत.

मात्र या मजुरांना सोमवारी मध्यप्रदेशला कुडाळवरून सुटणाऱ्या श्रमिक एक्स्प्रेसमधून पाठविण्यात येणार आहे तर बिहारमध्ये जाणाऱ्या मजुरांना त्या राज्याने जादा एक्स्प्रेस न सोडल्याने जाता येणार नसल्याचे तहसीलदार म्हात्रे यांनी त्यांना माघारी पाठविले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अडकलेले परप्रांतीय अनेक मार्गाने आपल्या मूळ गावी जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. गुरुवारी सकाळी झाराप-पत्रादेवी चौपदरी महामार्गावर धुळे पासिंगचा सिमेंट घेऊन आलेला ट्रक परतीच्या मार्गाला उत्तर प्रदेशकडे जात असताना या ट्रकमध्ये ८३ मजूर आढळले. त्यांना ताब्यात घेतले.सावंतवाडी पोलीस स्थानकात आणण्यात आल्यानंतर त्या मजुरांना सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोर नेण्यात आले. यावेळी सावंतवाडी पोलीस निरीक्षक खोत व तहसीलदार म्हात्रे यांनी चौकशी केली असता हे सर्व कामगार आपल्या गावी मध्यप्रदेश, बिहारकडे जात होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग