शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : आंबा वाहतुकीच्या वाहनचालकांची सोय ठेकेदार-बागायतदारांनी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 10:49 IST

आंबा व माल वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांसाठी ठेकेदार व बागायतदार यांनी विलगीकरणाची सोय करून त्याच्यासाठी सर्व अत्यावश्यक सुविधा पुरवाव्यात असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देआंबा वाहतुकीच्या वाहनचालकांची सोय ठेकेदार व बागायतदारांनी करावीगावात, परजिल्ह्यात जाणारा चालक वेगवेगळा असेल : के. मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्ग : मुंबई, पुणे तसेच बाधीत क्षेत्रातून आंबा वाहतूक करून परत आलेल्या वाहन चालकाने गावात जाऊन आंबा गोळा करू नये, तसेच गावातून आंबा गोळा करणारा व जिल्ह्याबाहेर त्याची वाहतूक करणारा असे दोन्ही वाहनचालक वेगवेगळे असावेत.

आंबा व माल वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांसाठी ठेकेदार व बागायतदार यांनी विलगीकरणाची सोय करून त्याच्यासाठी सर्व अत्यावश्यक सुविधा पुरवाव्यात असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.आंबा व माल वाहतुकीतील वाहन चालकांसाठी संबंधित ठेकेदार यांनी विलगीकरणासाठी जागा निश्चित करावी, सदर जागा शक्यतो तपासणी नाक्याच्याजवळ असावी. वाहनचालकास पुढील फेरीसाठी पाठवताना विलगीकरण केंद्रातूनच पाठवावे.

प्रत्येक फेरीनंतर वाहनचालकांची आरोग्य तपासणी करावी. वाहन चालकास कोरोनाची लक्षणे आढळल्यास संबंधित तालुका आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत कोरोना केअर सेंटरमध्ये रवानगी करावी. प्रत्येक फेरीनंतर सीमेवरच गाडीचे निर्जंतुकीकरण करावे.वाहन चालक मुंबई, पुणे किंवा बाधीत क्षेत्रातून आंबा, माल वाहतुकीच्या त्याच्या फेऱ्या पूर्ण केल्यानंतर गावात किंवा वॉर्डात आल्यावर ग्रामस्तरीय, वॉर्डस्तरीय नियंत्रण समितीचे त्यांना ग्रामस्तरीय, वॉर्डस्तरीय संस्थात्मक विलगीकरण केंद्रात पाठवावे.

चालक बाधित क्षेत्रातून आला असल्यास संबंधित तालुका आरोग्य अधिकारी यांनी त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याचा स्वॅब घेऊन तपासणी करिता पाठवावा. ग्रामस्तरीय, वॉर्डस्तरीय नियंत्रण समितीने १ मे रोजीच्या आदेशांमध्ये नमुद सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी. यासाठी संबंधित गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्राकरिता नोडल अधिकारी म्हणून काम पाहण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMangoआंबाcollectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग