शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : आचऱ्यातील गर्दी आटोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 14:37 IST

आचरा : आचरा तिठा ते आचरा बाजारपेठ परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने लॉकडाऊनचा नियम मोडणाऱ्यांवर आचरा पोलिसांनी कारवाई ...

ठळक मुद्देआचऱ्यातील गर्दी आटोक्यातविनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

आचरा : आचरा तिठा ते आचरा बाजारपेठ परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने लॉकडाऊनचा नियम मोडणाऱ्यांवर आचरा पोलिसांनी कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र, नियम मोडणाऱ्यांवर आचरा पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केल्यावर आचरा तिठा ते आचरा बाजारपेठमध्ये होणाऱ्या गर्दीला लगाम बसला आहे. यामुळे स्थानिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी असतानाही दुचाकी घेऊन फिरणाऱ्यांना आचरा पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. गेल्या दोन दिवसांत ४४ जणांवर आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.कोरोनासारख्या महाभयंकर संकटामुळे देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सुरुवातीला १४ एप्रिलपर्यंत असणारी संचारबंदी आता ३ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. याबाबत प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी केली जात आहे. मुंबई बांद्रा येथील घटनेमुळे पोलीस प्रशासनाने कडक धोरण अवलंबिले आहे.शुक्रवारी खरेदी करण्याच्या निमित्ताने आचरा येथे आलेल्या दुचाकी वाहकांच्या कागदपत्रांची पोलिसांनी तपासणी केली. यावेळी अपुरी कागदपत्रे असलेल्या दुचाकी चालकांवर मोटारवाहन अधिनियम कायद्याखाली केसेस दाखल करून सुमारे चार हजार दंड वसूल केला.

याबाबत आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी विनाकारण गरज नसतानाही कोणी फिरत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देत ग्रामस्थांनी घरातच थांबावे आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग