शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : कणकवलीत १४९ जण संस्थात्मक विलगीकरण कक्षात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 16:54 IST

कणकवली शहरातील संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये सध्या १४९ व्यक्ती ठेवण्यात आल्या आहेत . यापेक्षा अधिक संख्या वाढली तर हॉटेल, लॉज, मंगल कार्यालये आणि महाविद्यालयांचे वर्ग घेण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे.

ठळक मुद्देकणकवलीत १४९ जण संस्थात्मक विलगीकरण कक्षातबाहेरून येणाऱ्या सर्वांची चोख व्यवस्था : रवींद्र गायकवाड

कणकवली : कणकवली शहरातील संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये सध्या १४९ व्यक्ती ठेवण्यात आल्या आहेत . यापेक्षा अधिक संख्या वाढली तर हॉटेल, लॉज, मंगल कार्यालये आणि महाविद्यालयांचे वर्ग घेण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे.

याखेरीज शहरातील हॉटेल आणि लॉजमध्ये पेड क्वारंटाईनचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती कणकवली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक बंडू हर्णे यांनी दिली.कणकवली नगरपंचायतीच्या कार्यालयात नगराध्यक्षांच्या दालनात सोमवारी संयुक्तरित्या आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक अ‍ॅड. विराज भोसले उपस्थित होते.बंडू हर्णे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कणकवली नगरपंचायतीने शहरात सनियंत्रण समिती स्थापन केल्या आहेत. १७ प्रभागात या समित्या कार्यरत आहेत.

या समितीचे नगराध्यक्ष हे पदसिद्ध अध्यक्ष व मुख्याधिकारी सचिव आहेत. तर पोलीस उपनिरीक्षक अवधूत बनकर, अ‍ॅड. उमेश सावंत, डॉ. विद्याधर तायशेट्ये यांच्यासह नगरपंचायतीचे मनोज धुमाळे, विठ्ठल साटम, प्रियंका सोन्सूरकर, भगवान कदम आदी नोडल अधिकारी आहेत. नगरसेवकांबरोबरच आरोग्यसेवक व स्थानिक सदस्यही या समितीत आहेत.

सद्यस्थितीत वागदे येथील हॉटेल नाजुका, परमहंस भालचंद्र महाराज संस्थान भक्तनिवास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह हरकुळ बुद्रुक आणि फोंडाघाट येथील नामदेवराव मराठे यांचे कॉलेज ताब्यात घेण्यात आले आहे.वागदे येथील हॉटेल नाजुकामध्ये ३०, परमहंस भालचंद्र महाराज संस्थान भक्त निवासमध्ये २० जणांची व्यवस्था संस्थात्मक क्वारंटाईनसाठी करण्यात आली आहे. शहरात येणारे नागरिक सर्वप्रथम शासकीय उपजिल्हा रुग्णालयात जातात. तेथून त्यांना नगरपंचायतीकडे पाठविले जाते. यात रात्री-अपरात्री आलेल्या प्रवाशांना विलगीकरण कक्ष उपलब्ध होईपर्यंत अनेक तास वाट पहावी लागते.त्यामुळे ज्या नागरिकांचे नातेवाईक कणकवली शहरात येणार आहेत त्यांनी क्वारंटाईन कक्षासाठी आधीच नावनोंदणी करावी. जेणेकरून त्या प्रवाशांची उपजिल्हा रुग्णालयात तपासणी झाल्यानंतर त्यांची थेट विलगीकरण कक्षात रवानगी करता येईल.

भविष्यात शहरात येणाऱ्या चाकरमान्यांचा ओघ पाहता नगरपंचायत विलगीकरण कक्षासाठी अन्य पर्याय शोधत आहे. त्याचप्रमाणे पेड क्वारंटाईनची सुविधा देऊ इच्छिणाऱ्या हॉटेल मालकांनी आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही बंडू हर्णे यांनी यावेळी केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग