शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : गाळेल परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 15:31 IST

बांदा परिसरात बांदा, डेगवे, असनिये, सातोसेत प्रत्येकी १ आणि गाळेल येथे मंगळवारी रात्री उशिरा दोन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. बांदा परिसरात एकूण कोरोना बाधितांची संख्या ६ झाली आहे. गाळेल-मधलीवाडी येथे संस्थात्मक क्वारंटाईन असलेले वडील व मुलगा असे दोघेजण कोरोना बाधित आढळल्याने गाळेल परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर झाला आहे.

ठळक मुद्देगाळेल परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर बांदा परिसरात एकूण कोरोना बाधितांची संख्या ६

बांदा : बांदा परिसरात बांदा, डेगवे, असनिये, सातोसेत प्रत्येकी १ आणि गाळेल येथे मंगळवारी रात्री उशिरा दोन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. बांदा परिसरात एकूण कोरोना बाधितांची संख्या ६ झाली आहे. गाळेल-मधलीवाडी येथे संस्थात्मक क्वारंटाईन असलेले वडील व मुलगा असे दोघेजण कोरोना बाधित आढळल्याने गाळेल परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर झाला आहे.बांदा पोलिसांनी गाळेल प्राथमिक शाळेपासून ३०० मीटरपर्यंतचा परिसर बुधवारी सायंकाळी सील केला. या रुग्णाच्या संपर्कात असलेल्या पत्नीचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला. ते कुटुंब मुंबईहून आल्यानंतर त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन केले होते, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.गाळेल येथील मुंबईहून आलेल्या पती, पत्नीसह मुलाला प्राथमिक शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. दोन दिवसांपासून वडील व मुलगा यांना ताप व खोकला येत असल्याने त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दोघांचाही स्वॅब अहवाल मंगळवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती.प्रशासनाने तातडीने याची दखल घेतली असून सावंतवाडी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी ३०० मीटरपर्यंतचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. त्यानुसार बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी उशिरा ३०० मीटरपर्यंतचा परिसर सील केला आहे. आरोग्य विभागाकडून अती जोखमीत असलेल्या पत्नीचेही स्वॅब घेण्यात आले आहेत. अजूनही रुग्णांच्या संपर्कात कोणी आले होते का याची माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग