शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: कोरोनाचा फटका; ‘दशावतारी’चा दरबार ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 02:32 IST

कलाकारांवर उपासमारीची वेळ

- सचिन खुटवळकर दोडामार्ग/जिल्हा सिंधुदुर्ग : कोरोनाचा फटका लोककलाकारांनाही बसला असून, दशावतारी कंपन्यांचे मालक व कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाऊन व संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग व गोव्यासह मुंबईतील हजारो नाट्यप्रयोग रद्द झाल्यामुळे दशावतारी राजाचा दरबार ठप्प झाला आहे.कार्तिक पौर्णिमेपासून सुरू होणाऱ्या जत्रा व दशावतारी नाटकांच्या माध्यमातून कलाकार आपली उपजीविका चालवितात. वर्षातील सहा महिनेच ही नाटके होतात. त्यामुळे उर्वरित निम्मे वर्ष या कलेच्या माध्यमातून मिळणाºया तुटपुंज्या मानधनातूनच त्यांना उपजीविका चालवावी लागते. ९० टक्क्यांहून अधिक कलाकारांना नाटकांतून मिळणारे मानधन हाच आधार असतो. कोरोनामुळे हा आधारही हातचा गेल्यामुळे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत त्यांना पडली आहे, अशी माहिती नामवंत दशावतारी कलाकार, नाट्यलेखक दत्तप्रसाद शेणई यांनी दिली.जत्रांच्या माध्यमातून वार्षिक कराराप्रमाणे अतिशय तुटपुंजी रक्कम दशावतारी कंपन्यांच्या मालकांना मिळते. त्यात फायदा कमी व तोटाच जास्त, अशी स्थिती असते. जत्रांचा हंगाम संपल्यानंतर मार्च, एप्रिल व मे महिन्यात गावोगावी उत्सवानिमित्त दशावतारी नाटकांचे आयोजन केले जाते. त्यातून थोडीफार कमाई होते. मात्र यावर्षी जत्रांचा कालावधी संपतानाच कोरोनाचे संकट आल्यामुळे नियोजित नाट्यप्रयोग रद्द झाले आणि मोठे आर्थिक संकट कोसळले. महाराष्ट्र सरकारने याची दखल घेऊन दशावतारी लोककलाकारांना आर्थिक हातभार द्यावा, अशी मागणी बाळकृष्ण गोरे पारंपरिक लोककला दशावतार नाट्यमंडळाचे मालक बाळकृष्ण ऊर्फ दिनेश गोरे यांनी केली आहे.गोरे म्हणाले, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सरकारतर्फे मदतीचा हात देण्याचे आश्वासन दिले आहे. अन्य लोकप्रतिनिधींनीही आपल्या परीने हा विषय सरकारच्या निदर्शनास आणून दिला आहे. लोकाश्रयाच्या बळावर गेली ८०० वर्षांहून अधिक काळ ही कला टिकून आहे. आता सरकारच्या मदतीवरच आमची मदार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कधी आटोक्यात येईल व पुन्हा दशावताराला उभारी येईल, हे अनिश्चित आहे.आर्थिक साह्य मिळावेयावर्षीचा व्यवसाय पूर्णत: तोट्यात गेला. कलाकारांना मानधनाची रक्कम आगाऊ द्यावी लागते. त्यासाठी पतसंस्था, बँकांकडून कर्ज घ्यावे लागते. ते कर्ज कसे फेडावे, याची चिंता आम्हाला आहे. कंपनीच्या वाहनांचे हप्ते थकले आहेत. कलाकारांबरोबरच कंपन्यांचे मालक-चालक यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार पातळीवर विशेष आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे.मानधनावरच चालते घरनाट्यप्रयोगांतून कलाकारांना चांगली कमाई होते. मात्र, यावर्षी त्यावरही पाणी सोडावे लागले आहे. आमच्यापैकी बहुतेक कलाकारांचे घर दशावतारी नाटकातून मिळणाºया मानधनावरच चालते. सरकारच्या मदतीकडे आम्ही डोळे लावून आहोत. सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. तो प्रत्यक्षात उतरावा, ही अपेक्षा.- दत्तप्रसाद शेणई, कलाकार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या