शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

corona virus : कोरोनाबाबत व्यापक जनजागृतीची गरज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 18:38 IST

कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा काळात कोरोनाची लागण झाली नसूनही अनावश्यक भीतीमुळे अनेकांचा हृदयविकारासारख्या कारणांनी मृत्यू झाल्याची अनेक उदाहरणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात समोर येत आहेत. त्यामुळे असे मृत्यू होवू नयेत यासाठी आरोग्य विभागाला ठोस उपाययोजना करावी लागणार आहे.तसेच कोरोनाबाबत व्यापक जनजागृतीची अजूनही गरज आहे.

ठळक मुद्देकोरोनाबाबत व्यापक जनजागृतीची गरज !नागरिकांच्या मनात अनावश्यक भीती; उपाययोजना आवश्यक

सुधीर राणे कणकवली : कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा काळात कोरोनाची लागण झाली नसूनही अनावश्यक भीतीमुळे अनेकांचा हृदयविकारासारख्या कारणांनी मृत्यू झाल्याची अनेक उदाहरणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात समोर येत आहेत. त्यामुळे असे मृत्यू होवू नयेत यासाठी आरोग्य विभागाला ठोस उपाययोजना करावी लागणार आहे.तसेच कोरोनाबाबत व्यापक जनजागृतीची अजूनही गरज आहे.एखाद्याला साथीचा आजार झाला आणि तो जर रुग्णालय अथवा खासगी दवाखान्यात उपचारांसाठी गेला , तर त्याला प्रथम कोरोनाची चाचणी करण्यास अनेक डॉक्टरांकडून सांगितले जाते. रुग्ण अगोदर त्याला होणाऱ्या त्रासाने बेजार असतो .

अशा अवस्थेत ' कोरोनाची चाचणी करा ' म्हटल्यानंतर तो निम्मा गारद होतो. त्याच्या मनामध्ये चाचणी अहवाल ' पॉझिटिव्ह ' तर येणार नाही ना ? याची भीती असते . अशा भीतीमुळेसुद्धा कोरोना ' निगेटिव्ह ' असणारे रुग्ण ह्रदय विकाराच्या धक्क्याने मृत्यूमुखी पडल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत.इतर आजारावर उपचार घ्यायचे झाले , तर नागरिकांनी कुठे जायचे ? आणि हे उपचार घेतांना त्यांना कोरोनाची चाचणी करावी लागणार का ? या गोष्टीही आरोग्यविभागाने स्पष्ट करण्याची गरज आहे .पावसाळ्यातील वातावरणामध्ये हवामानात पालट होतो . अनेक नागरिक कामानिमित्त बाहेर जात असल्याने त्यांचे कधी कधी पावसात भिजणे होते . त्यामुळे सर्दी , खोकला आणि ताप यांचा त्रास होतो . कोरोनामध्येही ही लक्षणे असल्यामुळे नागरिकांमध्ये याविषयी भीती आहे . ती दूर करण्यासाठी शास्त्रीय दृष्टकोणातून कोरोनाबाबतची परिपूर्ण माहिती दिली गेली पाहिजे.कोरोनामुळे अन्य साथीचे रोग तसेच हृदयरोग , मधुमेह यांसारख्या अन्य आजारांकडे अनेकांचे दुर्लक्ष होत आहे . सर्दी , ताप , खोकला यांसारखे आजार तसेच डेंग्यू , मलेरिया यांसारख्या आजारांत पावसाळ्यात अधिक भर पडते . या आजारांवर उपचार करण्यासाठी रुग्णांनी कोणत्या रुग्णालयात अथवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जायचे ? याविषयी नागरिक अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट जाणवत आहे .

शासनाने कोरोनासमवेत अन्य आजारांवरील उपचारांसाठी राज्यातील संबंधित शासकीय रुग्णालये तसेच खासगी रुग्णालये यांना सूचना देऊन उपचारांची सोय करावी अन्यथा कोरोनाच्या ऐवजी अन्य साथीच्या आजाराने उपचारांविना रुग्णांना मृत्यूला सामोरे जावे लागेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग