शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

corona virus :  लसीकरणाची मोहीम लवकरच, जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 17:19 IST

CoronaVirus, collector, sindhudurg राज्य शासनाकडून कोरोना लसीकरणाची मोहीम लवकरच सुरू होणार आहे. ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कोरोना लसीकरणासाठी अंमलबजावणी समित्या तातडीने गठीत करा, असे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी दिले.

ठळक मुद्दे लसीकरणाची मोहीम लवकरच, जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठककोरोना लसीकरणाबाबत अंमलबजावणी समित्या तातडीने गठीत करा : मंगेश जोशी

सिंधुदुर्ग : राज्य शासनाकडून कोरोना लसीकरणाची मोहीम लवकरच सुरू होणार आहे. ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कोरोना लसीकरणासाठी अंमलबजावणी समित्या तातडीने गठीत करा, असे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सभागृहात कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा परिषद अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, नगरपरिषद, नगरपंचायतींचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी मंगेश जोशी पुढे म्हणाले, कोरोना लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने लाभार्थ्यांच्या याद्या तातडीने तयार करण्याचे काम करावे. यासाठी डाटा एंट्री ऑपरेटरची नियुक्ती करावी.

लस साठविण्यासाठी डीप फ्रिजर यांची पाहणी करून देखभाल व आवश्यक असल्यास दुरुस्ती तातडीने कराव्यात. लस वाहतुकीसाठी वाहनांचे नियोजन करावे. वाहनांची संख्या कमी पडत असल्यास वाहन भाड्याने घेण्याची प्रक्रिया तत्काळ राबवावी.जोशी पुढे म्हणाले, लसीकरणाबाबत शासनस्तरावरून लसीकरणाची अंमलबजावणी रुपरेषा व मार्गदर्शक सूचना तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्या सूचना प्राप्त होताच त्याप्रमाणे कार्यवाही व्हावी.लस देण्यासाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करामुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यावेळी म्हणाले, जिल्हा परिषद आरोग्य विभागाने लसीकरणासाठी ज्या ठिकाणी कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे त्यासंबंधीच्या जागा तातडीने निश्चित कराव्यात. लस देण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण शिबिरांचे तातडीने आयोजन करण्यात यावे.

लस देण्यासाठी सुरक्षा विषय सामुग्रीची यादी तयार करून मागणी संबंधित यंत्रणांकडे पाठवावी. आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्यांना ही लस प्राधान्याने देणात येणार असल्याने आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांची नोंदणी सुरू करावी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग