शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : शिष्यवृत्ती परीक्षा ; ६८५० विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 13:37 IST

पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांचा निकाल ७ महिन्यांचा कालावधी होत आला तरी लागलेला नाही. त्यामुळे ही परीक्षा दिलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६८५० विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.

ठळक मुद्देइयत्ता ५वी, ८ वी ची शिष्यवृत्ती परीक्षेला कोरोनाचा फटकासिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थिती

सुधीर राणे कणकवली : पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांचा निकाल ७ महिन्यांचा कालावधी होत आला तरी लागलेला नाही. त्यामुळे ही परीक्षा दिलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६८५० विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.संपूर्ण राज्यभरातून सुमारे १० लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. हे सर्व विद्यार्थी या परीक्षेचा निकालाकडे डोळे लावून बसले आहेत. या परीक्षेसाठी तयार केलेली उत्तरपत्रिका ओएमआर पद्धतीची असल्याने संगणकाद्वारे तपासली जाते. त्यामुळे फारसे मनुष्यबळ उत्तरपत्रिका तपासणीसाठी लागत नाही. मात्र, सात महिन्यांचा कालावधी परीक्षा घेऊन पूर्ण झाला असूनही अजूनही निकाल लागलेला नाही. त्यासाठी कोरोनाचा वाढता संसर्गही कारणीभूत आहे. असे सांगितले जात आहे.राज्यात २२ मार्चपासून कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने शासनाने लॉकडाऊन जाहीर केले होते. या लॉकडाऊनमध्ये कमी कर्मचाऱ्यांमध्ये काम करावे, असे आदेश शासनाने दिले होते. त्याचा फटका शिक्षण विभागाच्या कामकाजाला बसला असून त्याचा परिणाम शिष्यवृत्ती परीक्षा निकालावर झाला आहे.

मात्र, लॉकडाऊन उठविल्याने आतातरी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल लागेल का ? असा सवाल आता विद्यार्थी व पालकांकडून विचारला जात आहे. या परीक्षेनंतर झालेल्या दहावी व बारावीच्या परीक्षांचा निकाल उशिरा का होईना, लागलेला आहे. मात्र, या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल अजून लागलेला नाही.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने यापूर्वी ऑगस्ट त्यानंतर सप्टेंबरमध्ये या परीक्षेचा निकाल लागेल, असे जाहीर केले होते. मात्र, तसे झालेले नाही. राज्यभरातून ५ वीतील सुमारे ५ लाख ७४ हजार तर आठवीतील ३ लाख ९७ हजार विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट झाले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५ वीतील २५८८ व ८ वीतील ४२६२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांशी या निकालासंदर्भात संवाद साधला असता, ऑक्टोबर मध्ये निकाल जाहीर होईल, असे सांगण्यात आले.निकालाकडे लागले डोळे !सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २६२० विद्यार्थी ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यातील २५८८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर ३२ विद्यार्थी गैरहजर होते. ५ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला ४३०२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ४२६२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर ४० विद्यार्थी गैरहजर होते. अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. परीक्षेला बसलेल्या या सर्व विद्यार्थ्यांचे निकालाकडे डोळे लागले आहेत.

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीsindhudurgसिंधुदुर्ग