मालवण : सर्वच ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने कोरोना नियंत्रणासाठी गावस्तरावर ग्राम व प्रभागस्तरीय समिती पुन्हा सक्रिय करण्यात आली आहे. समितीवर लक्ष ठेवण्यासाठी संपर्क व सहसंपर्क अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक व मुख्य सेविका यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आदेशपत्रही देण्यात आले आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी दिली.दरम्यान, जिल्ह्याबाहेरून गावात येणाऱ्या व्यक्तींसाठी कोरोना चाचणी बंधनकारक असणार आहे. विहित मुदतीतील कोरोना चाचणी निगेटिव्ह सर्टिफिकेट सोबत असावे अथवा गावात आल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी करणे बंधनकारक असणार आहे. कोरोना लसीकरण दोन डोस घेतलेल्या व्यक्तींना आरोग्य अधिकारी यांच्या सल्ल्याने यातून सवलत असेल, अशी माहिती गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्यावतीने देण्यात आली.गटविकास अधिकारी दालन येथून तालुक्यातील ६५ ग्रामपंचायत सरपंच यांची ऑनलाईन बैठक मंगळवारी सकाळी पार पडली. यावेळी सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कुबेर मिठारी, आरोग्य विस्तार अधिकारी सुरज बांगर आदी उपस्थित होते.कोरोना परिस्थितीचा आढावा घ्यागावात ४५ वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण लस उपलब्धतेनुसार पूर्ण करून घेणे. आगामी काळात लसीकरण होणाऱ्या १८ वर्षावरील व्यक्तींची यादी तयार करणे. गावात औषध फवारणी व अन्य कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबवणे. संपर्क व सहसंपर्क अधिकारी यांनी गावात भेटी देऊन दर दिवशी कोरोना परिस्थितीचा आढावा घेणे असे आदेश, सूचना बैठकीत देण्यात आल्या. बैठकीत सरपंच यांनीही अनेक सूचना मांडल्या. त्यावरही उपाययोजना सुचवण्यात आल्या.
corona virus : सरपंचांची ऑनलाईन बैठक : गावात ग्राम, प्रभाग समितीचा वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 17:21 IST
CoronaVirus Malvan Sindhudurg : सर्वच ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने कोरोना नियंत्रणासाठी गावस्तरावर ग्राम व प्रभागस्तरीय समिती पुन्हा सक्रिय करण्यात आली आहे. समितीवर लक्ष ठेवण्यासाठी संपर्क व सहसंपर्क अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक व मुख्य सेविका यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आदेशपत्रही देण्यात आले आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी दिली.
corona virus : सरपंचांची ऑनलाईन बैठक : गावात ग्राम, प्रभाग समितीचा वॉच
ठळक मुद्देसरपंचांची ऑनलाईन बैठक : गावात ग्राम, प्रभाग समितीचा वॉच कोरोना चाचणी करणे बंधनकारक : गटविकास अधिकारी