शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

corona virus -कोरोनामुळे एस.टी.च्या उत्पन्नात घट; तोट्यात वाढ होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 17:19 IST

कोरोना विषाणूचा प्रभाव सर्वच व्यवसायांवर कमी अधिक प्रमाणात होत असून त्याचा फटका राज्य परिवहन महामंडळालाही बसला आहे.

ठळक मुद्देकोरोनामुळे एस.टी.च्या उत्पन्नात घट; तोट्यात वाढ होण्याची शक्यताप्रवासी घटल्याने सिंधुदुर्ग विभागातील अनेक फेऱ्या रद्द

सुधीर राणे 

कणकवली : कोरोना विषाणूचा प्रभाव सर्वच व्यवसायांवर कमी अधिक प्रमाणात होत असून त्याचा फटका राज्य परिवहन महामंडळालाही बसला आहे.

प्रवासी संख्येत कमालीची घट झाल्याने सिंधुदुर्ग विभागाला विविध आगारातून १८ मार्चपर्यंत एस.टी.च्या ३९९ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. ११ हजार ६४७ किलोमीटर अंतर धावणाऱ्या गाड्या रद्द कराव्या लागल्याने २ लाख ९३ हजार २७१ रुपयांच्या उत्पन्नाला सिंधुदुर्ग विभागाला मुकावे लागले आहे.सिंधुदुर्गातील एसटीच्या विविध आगारातील लांब पल्ल्याच्या मार्गावरील प्रवासी संख्येत कमालीची घट झाल्याने उत्पन्न कमी झाले आहे.या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने नागरिकांवर विविध निर्बंध घातले असून शक्यतो प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. या विषाणूच्या प्रभावामुळे राज्यातील रुग्णांची वाढती संख्या पाहता नागरिकांकडूनही शासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला जात आहे.काहींनी खबरदारीचा उपाय योजून लग्न समारंभ, विविध धार्मिक कार्यक्रम रद्द करून घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकांनी प्रवास करण्याचे टाळल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी संख्येवर परिणाम झाला असून गेल्या आठवड्यापासून उत्पन्न कमी झाल्याची माहिती एसटीच्या सूत्रांकडून देण्यात आली.कणकवली , मालवण , सावंतवाडी , वेंगुर्ले, देवगड, कुडाळ या एसटीच्या आगारातून जिल्ह्याबाहेर प्रतिदिन फेऱ्या सुरु आहेत. परंतु अनेक नागरिकांनी लांब पल्ल्याचा प्रवास टाळल्याने अनेकवेळा बसेस नियोजित मार्गावर रिकाम्या धावताना दिसत आहेत. त्यामुळे एसटीच्या फेऱ्या सुरु असल्याने विनाकारण इंधन खर्च होऊन उत्पन्नावर परिणाम होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्चपर्यंत शासनाने विविध निर्बंध कायम ठेवले असून मनाई आदेश काढले आहेत. यात्रोत्सव, आठवडा बाजार बंद ठेवण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे स्थानिक फेऱ्यांच्यावेळी एसटीच्या गाड्यांमधील प्रवासी संख्याही घटत आहे.आंगणेवाडी , कुणकेश्वर तसेच जिल्ह्यातील मोठी मंदिरेही भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी जाणाऱ्या भाविकांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत घट झाली आहे. यापुढील काळात एसटीचे भारमान असेच घटत राहिले तर मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल.कोरोनाचा एसटीला फटका !कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये . यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. जनतेचा प्रतिसादही त्याला लाभत आहे. या कोरोनाचा एसटीला फटका बसला आहे. अनेक प्रवासी एसटीतून प्रवास करताना मास्क तसेच रुमालाचा वापर करताना दिसत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटीsindhudurgसिंधुदुर्ग