शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : रिकव्हरी रेट घसरला, मृत्यूचा आकडा तिप्पट, सिंधुदुर्गात कोरोनाचा विस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 14:10 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनावाढीचा वेग झपाट्याने वाढत आहे. आॅगस्ट महिन्यात गुरुवार २७ आॅगस्टपर्यंत तब्बल ६९५ एवढे रुग्ण आढळून आले आहेत. ३१ जुलै रोजी जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३६४ होती आणि आता २७ आॅगस्टला ती १०५९ वर जाऊन पोहोचली आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्गात कोरोनाचा विस्फोट सुरूच आॅगस्ट महिना ठरलाय रुग्णवाढीतील उच्चांक

महेश सरनाईकसिंधुदुर्ग : जिल्ह्यात कोरोनावाढीचा वेग झपाट्याने वाढत आहे. आॅगस्ट महिन्यात गुरुवार २७ आॅगस्टपर्यंत तब्बल ६९५ एवढे रुग्ण आढळून आले आहेत. ३१ जुलै रोजी जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३६४ होती आणि आता २७ आॅगस्टला ती १०५९ वर जाऊन पोहोचली आहे.

सुरुवातीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर म्हणजे ८२ टक्के होता. आता मात्र, यामध्ये मोठी घसरण होऊन ५५.८६ टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. कारण या महिन्यात झपाट्याने रुग्ण वाढले आहेत. मृत्यू दर हा १.७२ टक्क्यांवर आहे. त्यामुळे राज्यासह देशभराच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मृत्यूदर रोखण्यात आरोग्य प्रशासनाला चांगले यश आले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण २६ मार्चला आढळून आला होता. त्यानंतर टप्पाटप्प्याने रुग्णसंख्या वाढत गेली. जिल्ह्यात २ मे पासून २६ आॅगस्टपर्यंत २ लाख ३ हजार व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर मार्च ते मे या काळातही ५० ते ६० हजार व्यक्ती दाखल झाल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यात असणाऱ्या लोकसंख्येत अडीच लाखांनी वाढ झाली आहे. सुरुवातीला मुंबई, पुणे येथील कंटेन्मेंट झोनमधून येणाऱ्यांना कोरोनाची लागण होत होती. त्यामुळे बाहेरून येणाºया व्यक्तीच कोरोनाची शिकार बनत होते.त्यानंतर मात्र, हळूहळू जून आणि जुलै महिन्यात स्थानिकांनाही कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली. जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणावर स्थानिकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातच आॅगस्ट महिन्यात गणेशोत्सव असल्याने मोठ्या प्रमाणावर चाकरमानी सिंधुदुर्गात येणार हे निश्चित होते. त्यामुळे आॅगस्ट महिन्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढेल असा कयास व्यक्त करण्यात येत होता आणि तो खराही ठरला आहे.गणेश चतुर्थी दिवशीच आढळले सर्वाधिक १३४ रुग्णजिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ व्हायला जून, जुलै महिन्यापासूनच सुरुवात झाली. मात्र, त्यावेळी दिवसभरात १0 ते १२ रुग्ण आढळून येत होते. त्यानंतर मात्र, आॅगस्ट महिन्यात कोरानाचे दिवसभरात सर्वाधिक रुग्ण आढळायला सुरुवात झाली.

यात ४ आॅगस्टला १५, ७ आॅगस्टला १७, ८ आॅगस्टला २५, १५ आॅगस्टला ३०, १७ आॅगस्टला ४६, २१ आॅगस्टला म्हणजे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी ७९ आणि २२ आॅगस्टला म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी तब्बल १३४ रुग्ण एकाच दिवशी आढळून आले.मृत्यूच्या आकड्यातही तिपटीने वाढसिंधुदुर्ग जिल्ह्यातील मृत्यूचा दर कमी ठेवण्यात प्रशासनाला मोठे यश आले आहे. राज्यासह देशातील इतर भागात मृत्यूचे प्रमाणे दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामानाने जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाण १.७२ टक्क्यांवर आहे.

ज्याप्रमाणात आॅगस्ट महिन्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे आॅगस्ट महिन्यातच कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाण तिपटीने वाढले आहे. जुलै महिन्यापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या केवळ ६ होती. आता २७ आॅगस्टपर्यंत त्यात तिपटीने वाढ होऊन ती १९ वर पोहोचली आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग