शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : रॅपिड टेस्ट सेंटर १ आॅगस्टपासून सुरू होणार, चाकुरकर यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 18:23 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खारेपाटण येथे १ आॅगस्टपासून कोरोना रॅपिड टेस्ट सेंटर सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी खारेपाटण येथे दिली.

ठळक मुद्देरॅपिड टेस्ट सेंटर १ आॅगस्टपासून सुरू होणार, धनंजय चाकुरकर यांची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांची खारेपाटण आरोग्य केंद्र, तपासणी नाक्याला भेट

खारेपाटण : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खारेपाटण येथे १ आॅगस्टपासून कोरोना रॅपिड टेस्ट सेंटर सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी खारेपाटण येथे दिली.यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नलावडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय नांद्रेकर, खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम, सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. पूजा ताडे आदी प्रमुख अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.कोरोना रॅपिड टेस्ट सेंटरच्या जागेची पाहणी व नियोजन करण्याच्या दृष्टीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चाकुरकर हे खारेपाटण येथे आले होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम व येथील कर्मचारीवर्गाला कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर योग्य त्या सूचना त्यांनी दिल्या.त्याचबरोबर खारेपाटण येथील सिंधुदुर्ग जिल्हा तपासणी नाक्यालाही त्यांनी भेट देऊन येथील महसूल पथक, आरोग्य पथक व पोलीस यंत्रणा व्यवस्थेची पाहणी केली. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम यांची नोडल आॅफिसर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. येथील एकूण ५ आरोग्य कर्मचाऱ्यांना याचे विशेष प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग