शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : दोडामार्गमध्ये कोरोना रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 16:34 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या दोडामार्ग तालुक्यात सुरूवातीला कोरोनाचे रूग्ण फारच कमी आढळत होते. मात्र, आॅगस्ट महिन्यात गेले आठ दिवस सातत्याने रूग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे.

ठळक मुद्देदोडामार्गमध्ये कोरोना रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ बाजारपेठ बंद ठेवण्यावरून मतमतांतरे, नागरिक धास्तावले

दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या दोडामार्ग तालुक्यात सुरूवातीला कोरोनाचे रूग्ण फारच कमी आढळत होते. मात्र, आॅगस्ट महिन्यात गेले आठ दिवस सातत्याने रूग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे.

सोमवारी नव्याने नऊ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यापैकी धाटवाडी येथील एकाच कुटुंबातील सात जण, बाजारवाडी एक तर वझरे मळेवाडी येतील एक असे आहेत. शहरात रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिक धास्तावले आहेत.दोन दिवसांपूर्वी मिळालेल्या तीन रुग्णांनामुळे बाजारपेठेतील गोवा रोडवरील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र आता रुग्णांची वाढती संख्या पाहता संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवायची की नको ? यावरून व्यापाऱ्यात मतमतांतरे चालू होती. नगरपंचायतने हा निर्णय व्यापारी संघटनेवर सोपविला आहे. त्यांच्या सहकार्यानुसार आम्ही कार्यवाही करू असे कसई- दोडामार्ग नगरपंचायतचे मुख्याधिकारी शिवाजी गायकवाड यांनी स्पष्ट केले.दोडामार्ग तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुख्यत्वे दोडामार्ग शहरातील वाढता आकडा नागरिकांना धास्ताऊन सोडत आहे. सोमवारी तालुक्यात नऊ अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. त्यातील आठजण दोडामार्ग शहरातील आहेत. तर एक वझरे मळेवाडी येथील एक अशी आकडेवारी देण्यात आलेली आहे.तालुक्यातील कोरोनाची वाढत्या संख्येमुळे आरोग्य विभागाला समोर गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. शनिवारी मिळालेल्या तीन रुग्णांमुळे बाजारपेठेतील गोवा रोडवरील सर्व दुकाने नगरपंचायत प्रशासनाने व्यापाऱ्यांच्या सहाय्याने बंद ठेवली आहेत. मात्र, सोमवारी एकाच दिवशी शहरात आठ रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे. काही व्यापाऱ्यांचे मत बाजार पेठे बंद ठेवावी तर काहींचे मत संपूर्ण बाजारपेठ बंद ठेऊ नये अशी भिन्न मतांतरे चालू आहेत.प्रशासनाने निर्णय घ्यावा : लिना कुबलदोडामार्ग शहरात दोन दिवसांत बारा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले आहेत. सोमवारी एकाच दिवशी आठ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने नगरपंचायत प्रशासनाने महत्वपूर्ण भूमिका निभाविणे गरजेचे आहे. त्यासाठी नागरीकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष लिना कुबल यांनी केले आहे.पाच दिवस बाजारपेठ बंदशहरात कोरोना वाढता प्रादुर्भाव पाहता बाजार समिती व व्यापारी यांनी सोमवारी समन्वय बैठक घेतली. या बैठकीत बाजारपेठ पुढील ५ दिवस अत्यावश्यक सेवा वगळता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला घेतला आहे. रविवारपासून दोडामार्ग शहरात तब्बल १२ रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्याने नागरिक व व्यापारी यांनी सतर्क राहणे महत्वाचे होते. यासाठीच बाजारपेठ बंदचा हा निर्णय घेतल्याचे उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग