शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : राणेंच्या कोविड लॅबला शासनाचा निधी, मग टेस्ट मोफत हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 16:45 IST

खासदार नारायण राणेंच्या कोविड लॅबसाठी राज्य शासनाचा निधी खर्च झाल्यामुळे राज्य शासनाच्या निकषानुसारच शुल्क आकारण्यात यावे, असे मत शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी प्रसिध्दी पत्रकातून व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देनारायण राणेंच्या कोविड लॅबला राज्याचे निकष हवेत : अतुल रावराणे शासनाचा निधी वापरला, मग टेस्ट मोफत हवी

वैभववाडी : राज्यातील विविध आमदारांनी दिलेल्या १ कोटींच्या निधीतून खासदार नारायण राणेंच्या मेडिकल कॉलेजमध्ये कोविड सुरु करण्यात आली आहे. मात्र, शासकीय निधीतून सुरु केलेल्या या लॅबमध्ये कोरोना तपासणीसाठी २ हजार ८०० रुपये शुल्क आकारले जाते, ते कसे? कोविड लॅबसाठी राज्य शासनाचा निधी खर्च झाल्यामुळे राज्य शासनाच्या निकषानुसारच शुल्क आकारण्यात यावे, असे मत शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी प्रसिध्दी पत्रकातून व्यक्त केले आहे.रावराणे पत्रकात म्हटले आहे की, राणेंच्या मेडीकल कॉलेजमध्ये सुरु करण्यात आलेल्या लॅबसाठी आमदारांनी दिलेला निधी हा राज्य शासनाचा आहे. त्यामुळे या लॅबला राज्य शासनाचे निकष लागू होणे आवश्यक आहेत. परंतु तसे न करता या लॅबमध्ये कोरोना तपासणीसाठी २ हजार ८०० रुपये घेतले जात आहेत, असा आरोप करीत त्यांनी आमदार नीतेश राणेंवरही टीका केली आहे.आमदार राणे हे ट्वीटरच्या माध्यमातून कोरोना टेस्ट करुन येणाऱ्या चाकरमान्यांना क्वारंटाईन करु नये असे सांगत आहेत. एका अर्थी ते आपल्या लॅबची जाहिरात करीत आहेत. जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांपैकी २५ टक्के लोकांनी जरी राणेंच्या लॅबमध्ये टेस्ट केली; तरी शासनाच्या पैशातून सुरु केलेल्या लॅबमधून त्यांना मोठा आर्थिक फायदा होणार असल्याचे रावराणे यांनी पत्रकात नमूद केले आहे.भैरी भवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरु केलेल्या ह्यबळीराजा आत्मसन्मानह्ण योजनेतंर्गत जिल्ह्यातील आर्थिक दुर्बल शेतकऱ्यांना आतापर्यंत २६ हजार काजू कलमांचे वितरण करण्यात आलेले आहे. या योजनेतून ५० हजार रोपांचे वितरण करण्यात येणार आहे.

परंतु, आॅगस्टनंतर काजू कलमांची लागवड करणे उचित नसल्याने उर्वरित २४ हजार रोपे पुढील हंगामात वितरीत करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांना १५ टन सेंद्रीय खतांचेही वितरण करण्यात आले आहे. या योजनेला जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे आम्ही हाती घेतलेल्या मिशन काजू क्रांतीचा पहिला टप्पा यशस्वी होताना दिसत आहे, असे रावराणे यांनी स्पष्ट केले आहे.देवेंद्र फडणवीस यांच्या कृतीवर टीकामुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी एका अधिवेशनात नारायण राणेंच्या गुन्हेगारी कृत्याचा पाढा वाचला होता. मात्र, त्यांनीच आता राणेंना नवीन उद्योगासाठी पक्षाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन दिला आहे. परंतु, भाजपचे निष्ठावंत माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे चालवित असलेल्या देवगड आंबा प्रकिया उद्योगाला फडणवीस निधी देऊ शकले नाहीत. जर त्यांनी या प्रकल्पाला निधी दिला असता; तर हा प्रकल्प आज डबघाईला आला नसता. आणि या प्रकल्पातून जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना त्याचा फायदा झाला असता, अशी टीका रावराणे यांनी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarayan Raneनारायण राणेsindhudurgसिंधुदुर्गhospitalहॉस्पिटल