शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : जिल्हा रुग्णालयामध्ये दर्जेदार सुविधा पुरवा : के. मंजुलक्ष्मी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 14:45 IST

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना दर्जेदार सुविधा पुरवाव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी बुधवारी दिल्या. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी बुधवारी जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट दिली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.

ठळक मुद्देजिल्हा रुग्णालयामध्ये दर्जेदार सुविधा पुरवा : के. मंजुलक्ष्मीदोन खासगी रुग्णालये कोविडसाठी अधिग्रहित

सिंधुदुर्ग : जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना दर्जेदार सुविधा पुरवाव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी बुधवारी दिल्या. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी बुधवारी जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट दिली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शेवाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर आदी उपस्थित होते.जिल्हा रुग्णालयातील स्वच्छतागृहांची दारे व खिडक्या तातडीने दुरुस्त कराव्यात. विशेषत: महिला वॉर्डमधील दुरुस्ती तातडीने करून घ्यावी. रुग्णांना आंघोळीला गरम पाण्यासाठी गिझर बसवावेत. स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी थंड व गरम असे दोन्ही प्रकारचे पाण्याचे फिल्टर बसवावेत, अशा सूचना मंजुलक्ष्मी यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड नियंत्रण कक्ष सुरू केला असून कोविड संदर्भात कोणतीही माहिती हवी असल्यास तसेच द्यावयाची असल्यास १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.दोन खासगी रुग्णालये कोविडसाठी अधिग्रहितकणकवलीतील संजीवनी रुग्णालयामध्ये ६ खाटा तर मालवणातील रेडकर रुग्णालयामध्ये १८ खाटा कोविड रुग्णांसाठी राखीव असणार आहेत. यामध्ये नियमित सेवा व विलगीकरणासाठी रुपये ४ हजार, व्हेंटिलेटरशिवाय आयसीयू दर ७ हजार ५00 तर व्हेंटिलेटरसह आयसीयूचे दर ९ हजार रुपये याप्रमाणे शासनाने ठरवून दिले आहेत. हेच दर या दोन्ही खासगी रुग्णालयामध्ये आकारण्यात येतील. याबाबत के. मंजुलक्ष्मी यांनी आदेश दिले आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग