शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

corona virus -वर्दळीच्या बसस्थानकात फक्त एसटी बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 17:17 IST

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये, सावंतवाडीत नागरिकांनी घरातून बाहेर पडण्याचे टाळले. तसेच एकही वाहन रस्त्यावर फिरताना दिसत नव्हते. बसस्थानकावर तर प्रवाशांविना सर्व एसटी बस उभ्या दिसत होत्या. पोलिसांनीही गाडीला स्पीकर लावून घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन नागरिकांना केले. तसेच पोलीस गाडीतून पेट्रोलिंग करताना दिसत होते.

ठळक मुद्देवर्दळीच्या बसस्थानकात फक्त एसटी बसेसपोलिसांची गाडीतून पेट्रोलिंग

सावंतवाडी : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये, सावंतवाडीत नागरिकांनी घरातून बाहेर पडण्याचे टाळले. तसेच एकही वाहन रस्त्यावर फिरताना दिसत नव्हते. बसस्थानकावर तर प्रवाशांविना सर्व एसटी बस उभ्या दिसत होत्या. पोलिसांनीही गाडीला स्पीकर लावून घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन नागरिकांना केले. तसेच पोलीस गाडीतून पेट्रोलिंग करताना दिसत होते.कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सरकार सर्व पातळीवर उपाययोजना करताना दिसत आहे. सावंतवाडीतही सकाळपासूनच रस्त्यारस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता. नेहमीच लगबगी असणारी ठिकाणे पूर्णत: शांत होती. सावंतवाडीत व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेवला होता. त्याला आणखी प्रतिसाद मिळाला.येथील बसस्थानकावर एकही प्रवासी दिसत नव्हता. सर्व एसटी बसेस उभ्या होत्या. शहरातील रिक्षा बंद ठेवण्यात आल्या होत्या. तसेच पोलीस अधूनमधून पोलीस व्हॅन फिरवून जनतेला घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन करत होते.

पोलिसांच्याही आवाहनाला नागरिक चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत होते. रस्त्यावर एकही वाहन फिरताना दिसत नव्हते. त्यामुळे जनता कर्फ्यू यशस्वी झाले असेच दिसत होते. जनतेने घरातच बसणे पसंत केल्याने पोलिसांचीही डोकेदुखी कमी झाली होती.

त्यामुळे सावंतवाडी शहरात नाक्यानाक्यावर दिसणारे पोलीसही दिसत नव्हते. मात्र, पोलिसांची एक व्हॅन शहरातून पेट्रोलिंग करत होती. एखादा नागरिक किंवा एखादे वाहन रस्त्यातून फिरताना दिसले तरी पोलीस त्यांची चौकशी करताना दिसत होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटीsindhudurgसिंधुदुर्ग