बांदा : सिंधुदुर्गमधूनगोवा राज्यात कामानिमित्त जाणाऱ्या युवकांची संख्या १४ हजारच्या आसपास आहे. त्यांची पंधरा दिवसानंतर रॅपिड टेस्ट करण्यात यावी. तसेच रोज गोवा सीमेवर तापमान, ऑक्सिजन लेव्हल तपासणी करूनच महाराष्ट्रात सोडण्यात यावे, अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या. कोरोनोच्या पार्श्वभूमीवर लसीकरण, रॅपिड टेस्ट, होम आयसोलेशन या संदर्भात सावंत यांनी बांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आढावा घेत चर्चा केली.यावेळी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, उपसभापती सावंतवाडी शीतल राऊळ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर, बांदा सरपंच अक्रम खान, पंचायत समिती सभापती निकिता सावंत, महिला बालकल्याण सभापती शर्वाणी गावकर, गट विकास अधिकारी व्ही. एम. नाईक, वित्त बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. जगदीश पाटील, डॉ. मयुरेश पटवर्धन, ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरस्कर, दोडामार्ग वैद्यकीय अधिकारी रमेश करतोसकर आदी उपस्थित होते.कर्मचारी वर्ग देण्याचे आश्वासनयावेळी डॉ. जगदीश पाटील यांनी आतापर्यंत झालेले लसीकरण, गृह अलगीकरण रुग्णांसंदर्भातील माहिती दिली. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात रोज रुग्णांची संख्या जास्त असून, अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे अतिरिक्त ताण येत असल्याचे सावंत यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यासंदर्भात सावंत यांनी कर्मचारी वर्ग देण्याचे आश्वासन दिले.
corona virus : सिंधुदुर्गमधून गोव्यात जाणाऱ्या युवकांची मोठी संख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 19:10 IST
CoronaVirus GoaBanda Sindhdurg : सिंधुदुर्गमधून गोवा राज्यात कामानिमित्त जाणाऱ्या युवकांची संख्या १४ हजारच्या आसपास आहे. त्यांची पंधरा दिवसानंतर रॅपिड टेस्ट करण्यात यावी. तसेच रोज गोवा सीमेवर तापमान, ऑक्सिजन लेव्हल तपासणी करूनच महाराष्ट्रात सोडण्यात यावे, अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या. कोरोनोच्या पार्श्वभूमीवर लसीकरण, रॅपिड टेस्ट, होम आयसोलेशन या संदर्भात सावंत यांनी बांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आढावा घेत चर्चा केली.
corona virus : सिंधुदुर्गमधून गोव्यात जाणाऱ्या युवकांची मोठी संख्या
ठळक मुद्देसिंधुदुर्गमधून गोव्यात जाणाऱ्या युवकांची मोठी संख्यापंधरा दिवसांनंतर रॅपिड टेस्ट करा : संजना सावंत