शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कुडाळ बाजारपेठ २३ सप्टेंबरपर्यंत आठ दिवस बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 17:46 IST

कुडाळ शहर बाजारपेठ बुधवार १६ ते २३ सप्टेंबरपर्यंत सलग आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय  कुडाळ तालुका व्यापारी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्दे कुडाळ बाजारपेठ २३ सप्टेंबरपर्यंत आठ दिवस बंद राहणारकुडाळ व्यापारी संघटनेच्या बैठकीत निर्णय, नागरिकांना सहकार्याचे आवाहन

कुडाळ : कुडाळ शहर बाजारपेठ बुधवार १६ ते २३ सप्टेंबरपर्यंत सलग आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय  कुडाळ तालुका व्यापारी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.

कुडाळ शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय भोगटे यांनी दिली. याबाबत नागरिकांनी, ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, या अनुषंगाने जिल्हा बंदची हाक देत जिल्हावासीयांनी यात सहभागी व्हावे, असे सांगण्यात आले.गेल्या काही दिवसांपासून कुडाळ शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनाने शहरातील प्रमुख बाजारपेठेतही शिरकाव केला आहे. त्यामुळे शहरातील ही साखळी तोडण्यासाठी शहर बंद ठेवावे असा सूर उमटू लागला. सोशल मीडियावर याबाबत जोरदार चर्चा झाली. त्यानंतर व्यापारी संघटनेने बैठक घेऊन कुडाळ शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.येथील मारुती मंदिराच्या धर्मशाळेत व्यापारी संघटनेची बैठक झाली. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय भोगटे, नगराध्यक्ष ओंकार तेली, भाऊ शिरसाट, विद्याप्रसाद बांदेकर, प्रसाद धडाम, संदेश पडते, अवधूत शिरसाट, अनुप तेली, अभय शिरसाट, राजेश महाडेश्वर, सुनील घुर्ये, विनायक राणे, राकेश कांदे, सतीश वर्दम, आबा धडाम, गणेश भोगटे, सुरेश चिंदरकर, सुनील बांदेकर, मिलिंद देसाई, अतुल सामंत, जालम सिंह पुरोहित, पी. डी. शिरसाट, शिल्पा घुर्ये, दीपक भोगटे आदी उपस्थित होते.

कुडाळ शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने ही साखळी तोडण्यासाठी एकजुटीने आपण हा बंद यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले. मागील लॉकडाऊनच्या काळात शहरातील एकजूट कोलमडल्याचे चित्र दिसले. त्यामुळे एकसंधता मोडली. आता यापुढे कुडाळची एकजूट दाखविण्यात यावी असा निर्धार करण्यात आला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गMarketबाजार