शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : ओरोस जिल्हा रुग्णालयात स्वच्छता नसल्याने रुग्णांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 17:43 IST

ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणारे ७० टक्के रुग्ण बाहेरचे जेवण घेतात. त्यामुळे बाहेरच्या व्यक्तींचा रुग्णालयात मुक्त संचार आहे. याखेरीज रुग्णालयात पुरेशी स्वच्छता राखली जात नसल्याने हे जिल्हा रुग्णालय कोरोनाचे प्रसारक झाल्याचा आरोप मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.

ठळक मुद्देओरोस जिल्हा रुग्णालयात स्वच्छता नसल्याने रुग्णांची गैरसोयजिल्हा रुग्णालयातील प्रकार, परशुराम उपरकर यांनी केला आरोप

कणकवली : ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणारे ७० टक्के रुग्ण बाहेरचे जेवण घेतात. त्यामुळे बाहेरच्या व्यक्तींचा रुग्णालयात मुक्त संचार आहे. याखेरीज रुग्णालयात पुरेशी स्वच्छता राखली जात नसल्याने हे जिल्हा रुग्णालय कोरोनाचे प्रसारक झाल्याचा आरोप मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जिल्हा रुग्णालय हे कोविड रुग्णालय म्हणून वापरले जात आहे. मात्र, येथे रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. ११ सप्टेंबरला तब्बल १० तास पाणी नव्हते.

याखेरीज पूर्वी उपचार घेऊन गेलेल्या रुग्णाच्या चादरी, उशा तशाच ठेवून तेथे आलेल्या दुसऱ्या रुग्णाला ठेवले जाते. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक कर्मचाऱ्यांची कोणतीही काळजी घेत नाहीत. रुग्णांचे नातेवाईक, चहा व जेवण देणारे सुरक्षितता न बाळगता कोविड सेंटरमध्ये ये-जा करत आहेत. यामुळे कोरोना संसर्गाचा धोका आणखीच वाढत आहे.जिल्हा रुग्णालयातील या गैरसोयीबाबत काही रुग्णांनी आपल्याकडे म्हणणे मांडले आहे. त्यानुसार शुक्रवारी रुग्णालयात तब्बल १० तास पाणी नव्हते. अशा स्थितीत आंघोळ व इतर स्वच्छतेची कामे कशी होणार ? या बाबींमुळे कोरोनाचा संसर्ग आणखीनच वाढत आहे.

कोविड सेंटरमध्ये गरम पाण्याची बाटली १५ रुपयाने घ्यावी लागत आहे. आॅक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या सिलिंडरची वाहतूक परिचारिका व नातेवाईकांना करावी लागत आहे. आॅक्सिजन संपला तर लक्षात येत नाही आणि लक्षात आल्यानंतर पळापळ केली जाते.कॅन्टीनमधील जेवण योग्य नसल्याने ७० टक्के लोक बाहेरच्या खानावळीतून जेवण मागवतात. कॅन्टीन व खानावळीतून जेवण घेऊन येणारे सुरक्षितता न बाळगता वॉर्डात फिरतात. पुन्हा ते आपल्या कॅन्टीनमध्ये जाऊन इतरांनाही नाश्ता देत असल्याने संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. मात्र, वॉर्ड फुल्ल करून ठेवलेला आहे. कोणी बघत नसल्याने नातेवाईक आत जातात. यामुळे संसर्ग वाढत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गParshuram Upkarपरशुराम उपरकर