शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : सिंधुदुर्गात जिल्हा परिषदेच्या सर्वच कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 16:34 IST

खबरदारी म्हणून जिल्हा परिषदेच्या सर्वच कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करून घेण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या सर्वच कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करून घ्या कोरोनाची बाधा : जिल्हाधिकाऱ्यांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आदेश

ओरोस :सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभागातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्यानंतर आणखी काही विभागातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह मिळाले आहेत. याबाबत खबरदारी म्हणून जिल्हा परिषदेच्या सर्वच कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करून घेण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिली.जिल्हा परिषद प्रशासनातील काही कर्मचारी कोरोना बाधित झाल्याने जिल्हा परिषद कार्यालय पूर्ण बंद ठेवण्याबाबत कर्मचाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांची मागणी होऊ लागली आहे. याबाबत सोमवारी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेतली असता त्या म्हणाल्या, जिल्हा परिषद कार्यालयातील कर्मचारी कोरोना बाधित सापडले आहेत. तसेच महसूल यंत्रणेतील काही कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत.

सर्वच शासकीय कार्यालय बंद ठेवून सर्वसामान्य जनतेची गैरसोय होणार आहे. त्यामुळे कार्यालय बंद ठेवण्यापेक्षा जिल्हा परिषदेच्या सर्वच कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करून घेण्याचे आदेश आपण मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे. कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये स्वतंत्र कक्ष निर्माण करून डॉक्टरांच्या पथकाकडून तपासणी करता येणे शक्य आहे.सिंधुदुर्गात दखल झालेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी ई पास ची सुविधा सुलभ केली जाईल त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे यावेळी जिल्हाधिकारी के .मंजुलक्ष्मी यांनी स्पष्ट केले.मृत्यूदर स्थिर ठेवण्यासाठी खबरदारीसिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव साठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी दाखल झाले आहेत. त्यामुळे १५ सप्टेंबर पर्यंत रुग्ण संखेत वाढ झालेली दिसून येईल तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये रुग्ण संख्या वाढली तरी मृत्यू दर स्थिर ठेवण्यासाठी खबरदारी घेतली जाईल.सर्वांकडून नियमांचे पालनजिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीच्या सरपंचांचे सहकार्य प्रशासनाला चांगले मिळाले असून गावागावातील गणपती उत्सव एकदम साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. गणपतीची भजने, आरत्या आपल्या घरातच तसेच गावातच ग्रामस्थ करत आहेत. सोशल डिस्टन्सचे पालन केलेले पहावयास मिळत आहे त्यामुळे आलेले चाकरमानी,तसेच सर्व स्थानिक नागरिक, ग्रामस्थ नायमांचे पालन करत असलेले पहावयास मिळत आहे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गcollectorजिल्हाधिकारी