शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : पीपीई कीट परिधान करून केले त्या महिलेवर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 12:18 IST

कोरोनासारख्या संकटकाळात एखाद्याच्या कुटुंबातील मृत्यूनंतर त्या कुटुंबावर ओढवणारी मानसिक स्थिती आणि या स्थितीवर मात करण्यासाठी तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत असे माणुसकीचे दर्शन घडवणारे शिरगांव येथील चार कोरोना योद्धे त्यांनी केलेल्या कामगिरीवरून सर्वांच्याच कौतुकास पात्र ठरले.

ठळक मुद्देपीपीई कीट परिधान करून केले त्या महिलेवर अंत्यसंस्कार शिरगांव येथील कोरोना योद्ध्यांची माणुसकी

शिरगांव : कोरोनासारख्या संकटकाळात एखाद्याच्या कुटुंबातील मृत्यूनंतर त्या कुटुंबावर ओढवणारी मानसिक स्थिती आणि या स्थितीवर मात करण्यासाठी तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत असे माणुसकीचे दर्शन घडवणारे शिरगांव येथील चार कोरोना योद्धे त्यांनी केलेल्या कामगिरीवरून सर्वांच्याच कौतुकास पात्र ठरले.याबाबत अधिक वृत्त असे की, किंजवडे परबवाडी येथील सुभद्रा जानू परब (७५) ही महिला कोरोना काळात आपल्या शिरगांव चौकेवाडी येथील मुलीकडे आली होती. २५ सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने तिचे रात्री ९.१५ च्या सुमारास निधन झाले. तिच्या निधनानंतर किंजवडे येथील नातेवाईकांना फोन करून कळविण्यात आले.

वृत्त समजताच नातेवाईक तातडीने रातोरात शिरगांव चौकेवाडी येथे आले. तिच्या मुलीच्या कुटुंबातील दोन सदस्य कोरोना बाधित तर जावई होम क्वारंटाईन असल्याने किंजवडे येथील नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास असमर्थता दर्शवली.सहकार्याची भूमिकाअंत्यसंस्कारासाठी कोणीच पुढे येत नसल्याने प्रशासनासमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला. अशा परिस्थितीत शिरगांवातील काही ग्रामस्थांनी किंजवडे येथील ग्रामस्थांशी संपर्क साधला. त्यावेळी किंजवडे येथील ग्रामस्थांनी किंजवडे येथे त्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यास कोणतीही हरकत नाही. अशी सहकार्याची भूमिका दाखविली.सामाजिक कार्यशिरगांव गावचे पोलीस पाटील चंद्रशेखर साटम यांच्यासह चौकेवाडी येथील सुजित चौकेकर, महेश चौकेकर, संतोष चौकेकर या चार कोरोना योद्ध्यांनी त्या कुटुंबाला धीरोदत्तपणे आधार दिला. घाबरू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे सांगून पीपीई कीट परिधान करून राजे ग्रुप या सामाजिक संस्थेच्या रुग्णवाहिकेने त्या वृद्धेचा मृतदेह किंजवडे येथील तिच्या गांवी नेऊन रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केले. कोरोनासारख्या कठीण काळात माणुसकीच्या झऱ्याला अजूनही पाझर बाकी आहे. याचा अनुभव शिरगांववासीयांना याची देही याची डोळा आला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग